Thackeray Group BMC Morcha: ठाकरे गटाचा महापालिकेवर विराट मोर्चा; आदित्य ठाकरे नेतृत्त्व करणार, उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
Thackeray Group BMC Morcha: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत.
Thackeray Group BMC Morcha: आज ठाकरे गटाचा (Thackeray Group) मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) धडक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) गेल्यानंतर मुंबई महापालिकेत (BMC) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्यानं करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार आहेत. मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे आरोप काय?
मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गट आज पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरेंच्यानेतृत्वाखाली आज ठाकरे गटाचा मोर्चा दुपारी 4 वाजता निघणार आहे. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार
मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मोर्चात सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेलासुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर स्टेज उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहेत. सुरुवातीला ठरवण्यात आलेला ठाकरे गटाच्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. आज हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते पालिकेच्या गेट क्रमांक दोनपर्यंत काढण्यात येणार आहे. या सुधारित मोर्चा मार्गाला पोलिसांची परवानगी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी मोर्चाच्या मार्गामुळे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत परवानगी नाकारली होती. त्यानंतर मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला.
मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खाजगी वाहनं घेऊन न येता लोकलनं प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि चर्चगेट येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज शनिवार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेला सुट्टी असणार आहे. अशातच महापालिकेच्या सुट्टीच्या दिवशी निघणारा हा मोर्चा कितपत सफल ठरणार? याबाबत सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.