एक्स्प्लोर

धक्कादायक...! मुंब्रा आणि औरंगाबादमधून ताब्यात घेतलेले 'ते' दहाजण प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घेणार होते!

आयसीसच्या 10 अतिरेक्यांना त्यांनी पकडले होते. या घातपाताची प्लॅनिंग आता समोर आली आहे. एटीएसने पकडलेल्या दहशतवादी तरुणांनी मुंब्रा इथे मुंब्रेश्वर मंदिराची रेकी केली होती आणि भंडाऱ्यातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा त्यांचा डाव होता. एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मुंबई : जानेवारी महिन्यात मुंब्रा आणि औरंगाबादेतून अटक केलेल्या 10 जणांविरोधात एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या दहा जणांचा संबंध दाईश या दहशतवादी संघटनेशी आहे. शिवाय त्यांचा थेट संबंध वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकशी असल्याचंही म्हटलं आहे. या आरोपपत्रात अटकेतील 10 आरोपींपैकी एकानं मुंब्रा येथील मुंब्रेश्वर मंदिरातील प्रसादात विष कालवून हजारो भाविकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचं म्हटलं आहे. 10 आरोपींपैकी काही मुंब्रा येथील आहेत, तर काही औरंगाबादेतील आहेत. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. मुंब्रा इथे मोठ्या घातपात करण्याचा डाव जानेवारीमध्ये एटीएसने उलथून लावला होता. आयसीसच्या 10 अतिरेक्यांना त्यांनी पकडले होते. या घातपाताची प्लॅनिंग आता समोर आली आहे. एटीएसने पकडलेल्या दहशतवादी तरुणांनी मुंब्रा इथे मुंब्रेश्वर मंदिराची रेकी केली होती आणि भंडाऱ्यातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा त्यांचा डाव होता. एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मुंब्रा येथील मुंबरेश्वर मंदिर 400 वर्षे जुने आहे. या मंदिरात 1 जानेवारी ते 8 जानेवारीमध्ये भगवदगीता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ 8 ते 10 हजार भाविकांनी घेतला. मात्र याच प्रसादाच्या विष कालवून भाविकांना मारण्याचा प्लॅन एका बाजूला शिजत होता. मुंब्रा आणि औरंगाबाद येथील 10 तरुण मिळून हा प्लॅन करत होते. त्यासाठी त्यांनी रेकी देखील केली होती. मात्र एटीएसने वेळीच कारवाई करून यांना पकडले आणि मोठा अनर्थ टळला, असे एटीएसचे म्हणणे आहे. चार्जशीटनुसार यातील काही तरुण हे मुंब्रात राहणारे होते. त्यांना मंदिराच्या इतिहासाची चांगली जाणीव होती. त्यामुळे इथे घातपात करून मास किलिंग करण्याचे षडयंत्र त्यांनी आखले होते. बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग यापैकी अबू हमजा नावाच्या त्यांच्या म्होरक्याने केली होती. मुंब्रा बायपासजवळ ते बॉम्ब फोडून देखील त्याने पाहिले होते. आपापसात संपर्क ठेवण्यासाठी त्यांनी वॉट्सअॅप नव्हे तर टेलिग्राम या अॅपचा वापर केला जेणेकरून बिंग फुटू नये. पण या दहा जणांनी मुंब्रातील आणखीन 6 जणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे 6 जण पोलिसांकडे गेल्याने अबू हमजा आणि त्याच्या साथीदारांची बिंग फुटले. नाहीतर महाराष्ट्रात यावर्षी अनेक घातपात आणि रक्तपात बघायला मिळाले असते. जे एटीएसने रोखले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget