एक्स्प्लोर
रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असे कंत्राटदारांकडून लिहून घ्या : हायकोर्ट

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर यापुढे खड्डे पडणार नाहीत, असं कंत्राटदारांकडून लिहून घ्या, असे आदेश मुंबई हायकोर्टानं महापालिकेला दिले आहेत. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास झाल्याचा अनुभव न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी सुनावणीच्या वेळी सांगितला.
दक्षिण मुंबई ते बोरिवलीचा प्रवास खड्ड्यामधून करावा लागतो. त्यामुळे हा त्रास झाल्याचा किस्साही कानडे यांनी सांगितला. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र त्याची वेळेवर देखभाल केली जात नाही. त्यामुळे कोर्टानं आता खड्ड्याची जबाबदारी कंत्रादारावर निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. त्यात पावसाळ्यात या खड्ड्यांची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. खरंतर मुंबईकरांना या समस्येची एक प्रकारे सवयच झाली आहे. मात्र, यामुळे पालिकेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संतापही आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
