एक्स्प्लोर

मुंबई लोकलमध्ये 45 टक्के महिलांची छळवणूक; रेल्वेच्या सर्वेक्षणातील आकडेवारी

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना काही असामाजिक घटकांकडून होणाऱ्या त्रासाला, छळवणुकीला सामोरे जावे लागते, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली

ठाणे/पालघर : उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना काही असामाजिक घटकांकडून होणाऱ्या त्रासाला, छळवणुकीला सामोरे जावे लागते, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 'मुंबई रेल्वे विकास महामंडळा'ने (एमआरव्हीसी) एका खासगी संस्थेच्या मदतीने विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत या स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे नुकतेच सर्वेक्षण झाले. यात पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू दरम्यान प्रवास करणाऱ्या 45 टक्के महिलांनी, तर मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या 40 टक्के महिलांनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले आहे. विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले. लोकलसाठी स्थानकांत होणाऱ्या गर्दीसोबतच काही असामाजिक घटकांकडून दिला जाणारा त्रासही जास्त असल्याचे मत यातील अनेक महिलांनी व्यक्त केले आहे. जवळपास 45 टक्के महिलांनी विरार ते डहाणूदरम्यानच्या प्रवासात छळ आणि त्रास होत असल्याचे सांगितले. यातील केवळ एक चर्तुथांश महिला रेल्वे पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे येतात. काही महिला या सुरक्षा हेल्पलाइनची मदत घेऊन आपली समस्या सोडवतात. अनेक महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फेरीवाले यांच्यामुळेदेखील त्रास सहन करावा लागतो. हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील नेरळ ते कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही आहे. कर्जत स्थानक हे गर्दीचे स्थानक झाले आहे. येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी गर्दीच्या वेळी लोकल डब्यात आसनव्यवस्था उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे सरासरी 10 पैकी 4 महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान काही असामाजिक घटकांकडून छळवणूक व अन्य त्रास सहन करावा लागत आहे. यातील 60 टक्के महिला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करतात. तर 13 टक्के महिला हेल्पलाइनचा आधार घेतात. महिलांसाठीच्या डब्यांमध्ये महिला पोलीस कर्मचारी असाव्यात, अशी मागणी महिलांकडून होऊ लागली आहे. व्हिडीओ पाहा

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget