एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबईतील 24 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी
नवी दिल्ली : नवी मुंबईतील 24 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. गर्भातील बाळाला दोन्ही किडनी नसल्याचं लक्षात आल्यानंतर 22 वर्षीय विवाहितेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
गर्भातील बाळाला दोन्ही किडनी नसून जन्मानंतर ते वाचण्याच्या शक्यताही कमी असल्याचं महिलेला तपासणीत लक्षात आलं. मात्र 20 आठवडे उलटून गेल्याने कायदेशीर गर्भपाताच्या परवानगीसाठी तिला सुप्रीम कोर्टाची दारं ठोठवावी लागली.
सुप्रीम कोर्टाने मुंबईतील केईएम रुग्णालयातील वैद्यकीय समिती स्थापन केली. 'गर्भातच भ्रूणाचा मृत्यू होण्याची किंवा जन्म झाल्यास मूल काही दिवसात दगावण्याची शक्यता आहे' असं या समितीने अहवालात म्हटलं. सध्या त्यावर कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याचंही समितीने स्पष्ट केलं.
2017 मधील अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत 20 आठवडे उलटल्यानंतर गर्भपाताच्या परवानगीसाठी दोन प्रकरणांचा सुप्रीम कोर्टाला निकाल द्यावा लागला आहे. महिलेच्या वतीने डॉ. निखिल दातार यांनी कोर्टाकडे दाद मागितली होती. जानेवारीतील डोंबिवलीच्या गर्भवतीचा दाखला देत कोर्टाने यापुढील प्रकरणांमध्ये संबंधित महिलेने कोर्टात सादर व्हावं, असं सुनावलं.
संबंधित बातम्या :
डोंबिवलीच्या गर्भवतीला 24 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement