एक्स्प्लोर

मध्य रेल्वेवर बुधवारी रविवारप्रमाणे वेळापत्रक, प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता

मध्य रेल्वेवर रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे बुधवारच्या दिवशी लोकल धावतील. म्हणजेच इतर दिवसांच्या तुलनेत लोकलच्या कमी फेऱ्या होतील. या निर्णयाचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो.

मुंबई : पावसामुळे पाणी साचून विस्कळीत झालेली मध्य रेल्वे 16 तासांनंतर अखेर पूर्वपदावर आली. मुंबईत पावसाने उसंत घेतल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मुंबईसह परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे मध्य रेल्वेने उद्या (बुधवारी) खबरदारीचा उपाय आखला आहे. मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. उद्याचा दिवस मध्य रेल्वेवर रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावतील. म्हणजेच इतर दिवसांच्या तुलनेत लोकलच्या कमी फेऱ्या होतील. या निर्णयाचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो. आज शाळा, कॉलेज आणि बहुतांश कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे असंख्य जण घराबाहेर पडले नाहीत. त्यातच लोकल बंद असल्यामुळे स्थानकांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र उद्या सर्व जण पुन्हा घराबाहेर पडणार आणि गाड्या खूप कमी असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे गर्दीत प्रवाशांचे हाल होणार हे निश्चित. रविवारी कमी गर्दी असूनही प्रवासी संख्या मध्य रेल्वे झेलू शकत नाही. त्यातच उद्या मधला दिवस आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरु शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 3 जुलै रोजी रद्द झालेल्या गाड्या 1)    11093 मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस 2)    51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर 3)    12169 पुणे-सोलापूर एक्स्प्रेस 4)    12170 सोलापूर-पुणे एक्स्प्रेस 5)    12127 मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस 6)    12128 पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस 7)    11010 पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस 8)    11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस 9)    11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस 10) 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस 11) 12125 मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस 12) 12126  पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस 13) 22102 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस 14) 22101 मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 15) 12118 मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस 16) 12117 एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस 17) 51317 पुणे-पनवेल पॅसेंजर 18) 51318 पनवेल-पुणे पॅसेंजर 3 जुलै रोजी अंशतः रद्द झालेल्या गाड्या   1)    12879 एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस : एलटीटी ते मनमाड दरम्यान रद्द 2)    11003 दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस : दादर ते पनवेल दरम्यान रद्द 3)    18519 विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस : पुणे ते एलटीटी दरम्यान रद्द 4)    18520 एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस : एलटीटी ते पुणे दरम्यान रद्द 5)    10112 मडगांव-मुंबई कोकण कन्या  :  पनवेल ते सीएसएमटी दरम्यान रद्द  (JCO 2.7.2019) 6)    10103 मुंबई-मडगांव मांडवी एक्स्प्रेस : सीएसएमटी ते पनवेल दरम्यान रद्द 7)    11301 मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस : सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान रद्द 8)    11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस : पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द 9)    11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस : सीएसएमटी ते पुणे दरम्यान रद्द 10) 17614 नांदेड-पनवेल एक्स्प्रेस : पुणे ते पनवेल दरम्यान रद्द (JCO 2.7.2019) 11) 17613 पनवेल-नांदेड एक्स्प्रेस : पनवेल ते पुणे दरम्यान रद्द 12) 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस : नाशिक ते सीएसएमटी दरम्यान रद्द (JCO 2.7.2019) 13) 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस : सीएसएमटी ते नाशिक दरम्यान रद्द 14) 11004 सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस : पनवेल ते दादर दरम्यान रद्द (JCO 1.7.2019) 3 जुलै रोजी पुढील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल 1)    15645 एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस आता 10.10 वाजता 2)    11061 एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस (JCO 2.7.2019) आता 7.00 वाजता 3)    11071 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस (JCO 2.7.2019) आता 0005 वाजता 4)    12141 एलटीटी पाटलीपुत्र एक्स्प्रेस (JCO 2.7.2019) आता 11.30 वाजता 3 जुलै रोजी पुढील गाड्या वेळापत्रकानुसार 1)    12051 दादर-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस 2)    12167 एलटीटी-मंडुअदी एक्स्प्रेस 3)    11067 एलटीटी-फैजाबाद साकेत एक्स्प्रेस 4)    22105 मुंबई-पुणे इंद्रायनी एक्स्प्रेस 5)    22106 पुणे-मुंबई इंद्रायनी एक्स्प्रेस 6)    12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस 7)    17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 8)    15017 मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस (अलाहाबाद मार्गे) 9)    12534 मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस 10) 11055 एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस 11) 12542 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस 12) 12362 मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस 13) 22511 एलटीटी-कामाख्या एसी एक्स्प्रेस 14) 16345 एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस 15) 11011 एलटीटी-नांदेड एक्स्प्रेस 16) 11085 एलटीटी-मडगांव डबल डेकर 3 जुलै रोजी पुढील गाड्यांच्या मार्गात बदल 1)    11025 भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (मनमाड-दौंड मार्गे) 2)    11026 पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (दौंड-मनमाड मार्गे)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget