एक्स्प्लोर
सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे
शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत.
मुंबई : एकीकडे खासगी बिल्डरला फायदा पोहोचवल्याच्या प्रकरणात प्रकाश मेहतांची गच्छंती होण्याची स्थिती असताना दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे.
प्रकाश मेहतांसोबतच मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंवरही कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.
धनंजय मुंडेंनी नेमका काय आरोप केला?
‘उद्योग विभागानं इगतपुरी येथील उद्योगासाठी 600 एकर जमिन संपादित केली होती. शिवसेनेच्या जवळ असणाऱ्या विकासकाला फायदा व्हावा म्हणून जवळजवळ 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी संपादनाच्या बाहेर काढली. हा काही हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे. याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि सुभाष देसाई यांचा राजीनामा घेण्यात यावा.’ असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement