एक्स्प्लोर

PPE kit : मुंबईतील विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी तयार केले हवेशीर पीपीई किट

हे पीपीई किट व्हेंटीलेशन (वायूवीजन) प्रणाली’चे डिजाईन हवा बंदिस्त करण्याचे काम करते आणि दर 100 सेकांदाना थंड हवा सोडते.

मुंबई : गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात. मुंबईतल्या निहाल सिंग आदर्श या विद्यार्थ्यासाठी त्याच्या डॉक्टर आईची गरज, संशोधन आणि कल्पकतेला प्रेरणा देणारी ठरली. त्याच्या या संशोधनाला ‘कोव्ह-टेक’ असे नाव देत निहालने पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था केली आहे. त्याच्या या नव्या आटोपशीर आणि किफायतशीर पीपीपी कीटमुळे, कोविडयोद्ध्यांना होणाऱ्या त्रासावर एक उत्तम तोडगा निघाला आहे.

मुंबईतल्या के जे सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात, द्वितीय वर्षाला असलेल्या, आनंदी निहालने आपल्या या संशोधनाविषयी पत्र सूचना कार्यालयाला माहिती देतांना इतर पीपीई सूट्स आणि ‘कोव्ह-टेक’ सूटच्या वापराचा अनुभव कसा वेगळा आहे, हे समजावून सांगितले. “कोव्ह टेक व्हेंटीलेशन (वायूवीजन) प्रणाली’ तुम्हाला पीपीई सूट मध्ये असतांना पंख्याखाली बसण्याचा अनुभव देते. या प्रणालीत, आजूबाजूची हवा आता घेतली जाते, ती फिल्टर करुन पीपीई सूटच्या आत घातली जाते. एरवी, सध्या उपलब्ध असलेल्या पीपीई सूटमध्ये हवा खेळती राहण्याची काहीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते घातल्यावर व्यक्तीला अत्यंत गरम आणि घुसमटल्यासारखे वाटते. मात्र, या संशोधनामुळे या कष्टदायक अनुभवातून सुटका होऊ शकेल आणि पीपीई सूटच्या आतही हवा खेळती राहू शकेल.” व्हेंटीलेशन (वायूवीजन) प्रणाली’चे डिजाईन हवा बंदिस्त करण्याचे काम करते. आणि दर 100 सेकांदाना थंड हवा सोडते.

ही समस्या दूर करण्याचा विचार मनात असतांनाच, कोविड-संबंधित उपकरणे डिझाईन करण्याच्या  टेक्नोलॉजीकल बिझनेस इन्क्यूबेटर ,रिसर्च इन्होवेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी  यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घ्यायचा त्याने निर्णय घेतला. कल्पक डिझाईन बनवण्याच्या स्पर्धेच्या तयारीला लागल्यावर, निहालने याचा अगदी प्रथमिक नमुना तयार केला. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील डॉ उल्हास खारुल यांच्या मार्गदर्शनाखाली, निहालने आपले पहिले डिझाईन 20 दिवसांत तयार केले.

डॉ उल्हास एक स्टार्ट अप संस्था चालवतात, ज्यात, हवा फिल्टर करण्यासाठी (गाळण्यासाठीच्या) उपयुक्त ठरेल असा पटल विकसित करण्यावर संशोधन करत आहेत. हवेतून कोविडचे विषाणू पसरण्यास प्रतिबंध व्हावा, हा या संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. त्यांच्या या प्रयोगांमधूनचा निहालला कल्पना सुचली की हवा फिल्टर करण्याची क्षमता आणि हवेची गुणवत्ता याचा जास्तीतजास्त समतोल साधण्यासाठी त्याने कशाप्रकारचा फिल्टर वापरायला हवा.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संधोधन, नवोन्मेष इन्क्युबेशन डिजाईन प्रयोगशाळा- RIIDL ची त्याला या कामात मदत मिळाली. सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर या उपकरणाचा प्राथमिक अवस्थेतील नमुना तयार झाला.ते गळ्यात घालण्याचे, इंग्रजी ‘U’ आकाराचे उपकरण होते, ज्यातून हवा आत खेचली जात होती. उशीसारखी रचना असलले हे उपकरण मानेभोवती घालता येत होते.   

निहालने हे उपकरण पुण्याच्या डॉ विनायक माने यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले. “ या नमुन्याची निष्पक्ष तपासणी व्हावी, अशी आमची इच्छा होती, त्यामुळे आम्ही डॉ. विनायक माने यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी असे लक्षात आणून दिले की या उपकरणातून सातत्याने निर्माण होणारी कंपने आणि त्यांच्या आवाजामुळे, मानेभोवती हे उपकरण घालणे, डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रासदायक होईल. त्यामुळे मग आम्ही तो नमुना रद्द केला आणि नव्या प्रकारच्या डिजाईन निर्मितीवर काम करायला लागलो.” ज्या उपकरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत होईल, त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, असे उपकरण विकसित करण्यावर आमचा भर होता, असे निहाल ने पत्रसूचना कार्यालयाला सांगितले.

निहालने तब्बल 20 विकसनशील आणि उपकरणाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी 11 वेगवगेळ्या प्रकारचे बदल करत अंतिम मॉडेल तयार केले. त्यासाठी, RIIDL चे मुख्य नवोन्मेष सहायक गौरव शेट्टी आणि पुण्याच्या दसॉ सिस्टिम्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खूप मदत झाली. दसॉ सिस्टिम्स मध्ये असलेल्या अत्याधुनिक स्वरूपाच्या प्रणालीच्या अभ्यासातून, निहालला त्याच्या उपकरणाला अंतिम स्वरूप देणे सोपे झाले.

उपकरणाचा अंतिम नमुना : एका साध्या बेल्टइतका सुलभ

निहारने, या उपकरणाचे अंतिम डिझाईन तयार असून ते एखाद्या बेल्टसारखे वापरता येते. आता असलेल्या पीपीई सूटवर देखील ते घालतायेऊ शकते. या डिझाईनमुळे दोन उद्देश साध्य केले जातात. एकतर आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई सूटमध्येही वायूविजनाची सुविधा मिळून त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. दुसरे  त्यांचे विविध बुरशीजन्य आजारांपासूनही संरक्षण होऊ शकते.

हे व्हेंटीलेटर शरीराजवळचा घातले जात असल्याने, त्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे घटक वापरले जातात, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांचेही काटेकोर पालन केले गेले आहे, असे निहारने सांगितले. “जेव्हा मी माझ्या आईला सांगितले की माझ्या या शोधाबद्दल मी पेटंटसाठी अर्ज करणार आहे, तेव्हा ती खूप खुश झाली.माझी आई डॉक्टर असल्याने, ती जेव्हा जेव्हा कामावर जाते, तेव्हा या उपकरणाचा वापर करतेच.” निहार म्हणाला. लिथियम-आयोनची बैटरी वापरून ही प्रणाली तयार करण्यात आली असून ते सहा ते आठ तास काम करते.

डिजाईन अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या रित्विक मराठे आणि सायली भावसार, यांनीही निहालला त्याच्या या प्रकल्पात मदत केली. सायलीने त्यांच्या कंपनीसाठी वेबसाईट विकसित करण्याची जबाबदारी घेत, https://www.watttechnovations.com, या वेबसाईटचे डिझाईन तयार केले.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget