एक्स्प्लोर
Advertisement
'पेट' परीक्षेत मुंबई विद्यापीठाचा सावळागोंधळ, विद्यार्थी संभ्रमात
मराठी, इतिहाससारख्या विषयामध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिसर्च मेथोडोलॉजीचा हा 50 मार्कांचा पेपर इंग्रजीमध्येआल्याने अनेक विद्यार्थी गोंधळात पडले. परीक्षेत अनेकांनी प्रश्न सोडून दिले. परिक्षार्थीना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा सावळागोंधळ पुन्हा समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या पीचडी परीक्षेच्या (पेट) प्रवेश परीक्षेत परीक्षार्थी संभ्रमात आहेत. पेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रिसर्च मेथडॉलॉजी हा पेपर पूर्णपणे इंग्रजीमध्ये आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
मराठी, इतिहाससारख्या विषयामध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिसर्च मेथोडोलॉजीचा हा 50 मार्कांचा पेपर इंग्रजीमध्येआल्याने अनेक विद्यार्थी गोंधळात पडले. परीक्षेत अनेकांनी प्रश्न सोडून दिले. परिक्षार्थीना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रथमच ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलेली परीक्षा मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.
ही परीक्षा 4 विद्याशाखांमधून 78 विषयामध्ये घेतली जात असून या परीक्षेला एकूण 6,168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
युजीसीच्या निर्णयानुसार यावर्षी पासून रिसर्च मेथडॉलॉजीचा विषय 50 मार्क आणि ऐच्छिक विषयाचा पेपर 50 मार्क अशी परीक्षा ऑनलाइन घेतली गेली. 12 ते 2 दरम्यान ही परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. मात्र विद्यापीठाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement