सायन रुग्णालयात PPE किट्स, मास्क मिळत नसल्याचा विद्यार्थिनी परिचारिकांचा आरोप
सायन रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार करताना मास्क, पीपीई किट मिळत नसल्याचा आरोप, येथील विद्यार्थिनी परिचारिकांनी केला आहे.
मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील विद्यार्थिनी परिचारिकांनी रुग्णालयातील गैरसोयीबाबत तक्रार केली आहे. कोणत्याही पीपीई किट आणि मास्क शिवाय कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आणि संशयित रुग्णांच्या संपर्कात यावं लागत असल्याने आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असून याबाबत आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनी शिकाऊ परिचारिका यांना कोरोना रुग्णांच्या किंवा कोरोना संशयित वार्डमध्ये काम करत असताना त्यांना साधं एन 95 मास्क किंवा पीपीई किट सुद्धा पुरवली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थिनी परिचारिका यांनी केला आहे.
यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या 16 विद्यार्थिनी परिचारिका कोरोना पोझिटीव्ह आढळल्याने त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं या विद्यार्थिनीचं म्हणणं आहे. शिवाय काही परिचारिका या कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये तर काही जनरल वर्डमध्ये काम करत आहेत. 540 रुपये स्टायपंडमध्ये जीव धोक्यात घालून काम करावं लागतं असून अनेक विद्यार्थिनींना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं या परिचारिका विद्यार्थिनींनी सांगितलं. हे असून सुद्धा अजूनही खबरदारी म्हणून या विद्यार्थीनी परिचारिकांकडून जीव धोक्यात घालून काम करवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कोणत्याही प्रकारची सुरक्षितता घेतली जात नसल्याचा या विद्यार्थिनी परिचारिका यांनी आरोप केला असून आमच्या जीवाशी खेळू नये, अशी विनंती प्रशासनांकडे केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय
आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतो, आरोपात तथ्य नाही यावर आम्ही सर्व किट आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेत आहोत. मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर मास्क, पीपीई किट येत आहेत. त्यामुळे हा आरोप किंवा तक्रार चुकीची आहे. रोज 450 पीपीई किट आमच्या हॉस्पिटलला येतात. त्यामुळे या आरोपात सत्यता नाही, तरीही त्यांची मटर्न आल्यावर याबाबत बोलू, असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
Raj Thackeray | दारुची दुकानं सुरु करण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीचा विचार व्हावा : अर्थतज्ञ गिरिश कुबेर