एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक, प्रवासमार्गात सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय

Ganeshotsav 2023 : आगामी गणेश उत्सवाबाबत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली.

मुंबई : आगामी गणेश उत्सवाबाबत (Ganeshotsav 2023) राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी (State Highway Traffic Police) मंगळवारी (5 सप्टेंबर) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला एमएसआरडीसी (MSRDC), पीडब्ल्यूडी (PWD), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली. विविध ठिकाणी सुविधा केंद्र तयार केले जातील, जिथे माता आपल्या मुलांना आहार देऊ शकतील, वैद्यकीय मदत आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, तसेच कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अंधार असलेल्या ठिकाणी दिवे आणि सूचना फलक लावले जातील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. 

वाहनचालकांसाठी कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न 

याबाबत महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी या बैठकीविषयी माहिती दिली. गणेशोत्सव हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणातील आपल्या मूळगावी जातात. या आठवड्यापासून चाकरमानी गावी जाण्यास सुरुवात करतील. वाहनचालकांसाठी एक कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहेत. 

कोकणात जाणाऱ्या बसचे मार्ग, उपाययोजनांची माहिती सोशल मीडियावर मिळणार

या बैठकीला एमएसआरटीसीचे अधिकारीही उपस्थित होते. कारण सणासुदीत कोकणात बसद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. या  बसेसचे मार्ग कसे असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील यावर बैठकीत चर्चा झाली. महामार्ग पोलीस त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत अपडेट्स पोस्ट करतील. तसेच त्यांनी भाविक आणि वाहनधारकांना वाहने चालवताना सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 3100 जादा बसेस धावणार

यंदा गणपती बाप्पांचं 19 सप्टेंबर 2023 रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झालं आहे. गणेशोत्सव आणि कोकणाचं अनोखं नातं आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काळात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल असतात, अशातच एसटी (ST Bus) महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3,100 जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Ganeshotsav And Traffic : गणेशोत्सव अन् वाहतुकीच्या समस्या; पोलिसांच्या राज्यस्तरीय बैठकीत काय झालं?

हेही वाचा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास वेगवान होणार; 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Bhandara Crime: भंडारा हादरले ! भर रस्त्यात गाठलं, सर्वांच्या देखत संपवलं, वाचवायला गेलेल्या मित्राचाही बघता बघता जीव गेला
भंडारा हादरले ! भर रस्त्यात गाठलं, सर्वांच्या देखत संपवलं, वाचवायला गेलेल्या मित्राचाही बघता बघता जीव गेला
BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
Embed widget