एक्स्प्लोर
पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत आज (गुरुवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत आज (गुरुवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी तीन जणांची उपसमिती नेमून निर्णय घेतला जाणार असल्याचंही समजतं आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा या समितीत समावेश असणार आहे. ही समिती विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे.
4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस मिळत नाहीत. तसंच कामाला गती देण्यासाठी हे अधिवेशन गरजेचं असल्यानं नागपुरातच पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार विचार करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement