एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Patra Chawl : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा, 2018 पासूनचे थकित दरमहा 25 हजार रुपयांचे भाडे मिळणार

Goregaon Patra Chawl : पत्राचाळ (Goregaon Patra Chawl) पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे.

Goregaon Patra Chawl : गोरेगावमधील पत्राचाळ (Goregaon Patra Chawl) पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. रहिवाशांना 2018 पासुनचे थकित दरमहा 25 हजार रुपयांचे भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) 672 रहिवाशांची थकीत घरभाडे देण्याची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. 

गोरेगावमधील सिद्धार्थनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प 2008 मध्ये एका खासगी विकासकाला देण्यात आला होता. या विकासकाने येथील 672 मूळ रहिवाशांना घरभाडे देऊन त्यांची घरे रिकामी केली होती. त्यानंतर पुनर्विकासाला सुरुवात केली. मात्र विकासकाने पुनर्विकास पूर्ण केलाच नाही. पुनर्वसन इमारतींची कामे अर्धवट सोडून दिली. 2016 पासून 672 राहिवाशांचे घरभाडेही बंद केले. अखेर राज्य सरकारनं या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत विकासकाविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली. 2018 मध्ये प्रकल्प विकासकाकडून काढून घेतला आणि मुंबई मंडळाला हस्तांतरित केला. त्यानुसार आता मंडळ पुनर्वसन इमारतीचे बांधकाम करत आहे.

राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानं काढलं पत्रक

येत्या काही महिन्यातच या रहिवाशांना हक्काच्या घरांचा ताबा दिला जाणार आहे. आता या रहिवाशांना राज्य सरकारने आणखी एक मोठा दिलासा दिला. हे रहिवासी 2016 पासून स्वखर्चाने भाड्याच्या घरात राहत आहेत. या रहिवाशांना आता 2018 पासूनचे घरभाडे मिळणार आहे. याबाबतचे पत्रक राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानं काढलं आहे. 2016 पासूनचे थकीत घरभाडे देण्याची मागणी राहिवाशांनी केली होती. या मागणीनुसार 2018 पासून, अर्थात मंडळाने प्रकल्प ताब्यात घेतल्यापासून ते मार्च 2022 पर्यंतचे घरभाडे देण्यात येणार आहे. मार्च 2022 पासूनचे नियमित महिना 25 हजार रुपये घरभाडे मंडळाकडून देण्यात येत आहे. तर आता फडणवीस यांनी 2018 ते मार्च 2022 पर्यंतचे घरभाडे देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. 2018 पासूनचे घरभाडे देण्यात येणार असून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई; राकेश आणि सारंग वाधवान यांची 31.50 कोटीची मालमत्ता जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Embed widget