एक्स्प्लोर

St. Xavier's College : विद्यार्थ्यांचा विरोध डावलत सेंट झेवियर्स महाविद्यालय ऑफलाइन परीक्षा घेण्यावर ठाम

Mumbai : दक्षिण मुंबईतील सेंट. झेवियर्स महाविद्यालयाने परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयांपैकी एक म्हणजेच सेंट झेवियर्स महाविद्यालय (St. Xavier's College) याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोविड लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे ते गेल्या दोन वर्षांपासून लेक्चरला उपस्थित राहिले नाहीत. आतापर्यंतची सर्व लेक्चर्स ऑनलाइन झाली आहेत; त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची या निर्णयावर नाराजी आहे. कॉलेज अधिकाऱ्यांना केलेल्या ऑनलाइन अपीलमध्ये, विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात एकूण 1,287 सही गोळा केल्या. परंतु, झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 

28 मार्च रोजी सकाळी 8.15 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी कॉलेजने आपल्या वेबसाइटवर आसनव्यवस्था केली आहे. लेक्चर्स 26 मार्चला संपणार आहेत. विद्यार्थ्यांना ना 'अभ्यासासाठी सुट्टी' दिली जात आहे ना पेपरमधील थिअरी प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा वेळ दिला जात आहे.

या संदर्भात, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिक्षण सहसंचालकांना महाविद्यालयांना पत्र लिहिण्याचे निर्देश दिले होते. यावर सोनाली रोडे, सहसंचालक म्हणाल्या, “आम्ही ज्या महाविद्यालयांनी सेमिस्टर 6 च्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना विनंती करत आहोत. कारण असे केल्याने गुणांमध्ये असमानता आढळेल. तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे."

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 72(10) अंतर्गत तत्सम कायदे स्वायत्त महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी, परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि निकालांची माहिती देण्याचे मार्ग विकसित करण्यास परवानगी देतात. ज्या महाविद्यालयांनी ऑफलाइन परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना या नियमापासून संरक्षण दिले जात आहे.

“आम्हाला मुंबई विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने वागणूक मिळावी अशी आमची इच्छा आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आपल्या सर्वांसाठी समान असले पाहिजे. जर आम्हाला परीक्षा ऑफलाइन लिहिण्यास सांगितले जात असेल तर विद्यापीठातील उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑफलाइन जावे. मूल्यमापन परीक्षेद्वारे देखील केले जाऊ शकते,” असे विद्यार्थ्याने म्हणणे आहे. 

झेवियर्स हे 2010 मध्ये मुंबई विद्यापीठाने ऑटोनॉमी दिलेले पहिले महाविद्यालय होते. जेसुइट्सने 2 जानेवारी 1869 रोजी त्याची स्थापना केली होती. तेरेसा अल्बुकर्क, इतिहासकार; नॉर्मा अल्वारेस, गोवा पर्यावरणतज्ज्ञ; झीनत अमान, अभिनेता; मुकेश अंबानी; रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख; शबाना आझमी, अभिनेत्री आणि विद्या बालन, अभिनेत्री हे सगळे दिग्गज सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 

सहसंचालक उच्च शिक्षण (मुंबई विभाग) कार्यालयाकडून 11 मार्च रोजी शेवटच्या सत्राच्या परीक्षांच्या आचार पद्धतीत बदल करण्याची विनंती करणारे पत्र प्राप्त झाल्यानंतर सोफिया कॉलेजने ऑफलाइन परीक्षा ऑनलाइन मोडवर हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget