एक्स्प्लोर

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा : अनिल परब

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परत जाण्यासाठी एसटीतर्फे मोफत बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. येत्या 18 मेपर्यंतच ही सेवा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही मोफत बस सेवा येत्या 18 मे पर्यंतच असेल. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात येईल, असंही अनिल परब म्हणाले. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल.

कन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त कोणाला जायचं असेल त्यांना जाता येणार आहे. प्रत्येकाला परवानगी घेऊनच प्रवास करायचा आहे. त्यापूर्वी त्यांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी करुन परवानगी दिली जाईल," असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

"लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करु नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. व्यवस्थित माहिती घेऊन, शिस्त पाळून मूळगावी परत जा," असं आवाहनही अनिल परब यांनी केलं. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी अन्नपाणी सोबत ठेवावं. एसटीचीच प्रसाधन गृह वापरण्यात येतील. ती स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं अनिल परब म्हणाले. बस कुठून आणि कधी निघणार याची माहिती मोबाईलवर : अनिल परब "जर 22 लोकांना प्रवास करायचा असेल त्यांनी नाव, पत्ता, इच्छित स्थळ, आधार कार्ड क्रमांक ही माहिती भरलेला अर्ज शहरी भागात पोलीस आयुक्तालयात द्यायचा आहे. तर ग्रामीण भागातील लोकांनी हा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे अर्ज द्यायचा आहे. ज्या जिल्ह्यात ते जाणार आहेत, त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर, प्रवासाची एसटी बस कुठून आणि किती वाजता निघणार याची माहिती मोबाईलद्वारे दिली जाईल. ज्यांना वैयक्तिक प्रवास करायचा आहे, अशा लोकांसाठी एसटीने पोर्टल तयार केलं आहे. ते सोमवारपासून सुरु होईल. त्यावर ऑनलाईन परवानगी घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना प्रवासाची माहिती दिली जाईल," असं अनिल परब यांनी सांगितलं. प्रवासादरम्यान नियम आणि अटी एसटीमधून प्रवास करताना प्रवाशांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. या नियमानुसार, "प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. मास्क घालणं बंधनकारक आहे. एसटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशाने हाताला सॅनिटायझर लावणं गरजेचं आहे. प्रत्येक बस प्रवास सुरु होण्याआधी आणि प्रवासानंतर निर्जंतुक केली जाईल. जिल्ह्यात एसटी पोहोचेल तिथला नोडल अधिकारी प्रवाशांची काळजी घेईल. गरज वाटल्यास वैद्यकीय तपासणी केली जाईल." ही सेवा 18 तारखेपर्यंत असेल, जेणेकरुन अडकलेले लोक आपापल्या मूळ गावी परत जातील," असं परब म्हणाले. Minister Anil Parab on ST Bus Service | एसटीतर्फे बससेवा मोफत : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget