एक्स्प्लोर

ST bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांसमोर समस्या, कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार?

ST bus strike: गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. मुंबई सेंट्रल एसटी आगारात अनेक प्रवाशी ताटकळत उभे आहेत. राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगारे पूर्णपणे बंद

मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे. कोकणातील दापोली, खेड या एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी एसटी संपाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला होता. याचा परिणाम कोकणातील एसटी सेवेवर दिसून येत आहे. मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर याचा प्रभाव जाणवत आहे. रात्री बाहेरील डेपोतून गाड्या मुंबई सेन्ट्रलमध्ये येणं अपेक्षित होते. मात्र, या एसटी बसेस आगारात न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात. तसे झाल्यास गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे.

जिच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्याच एसटीनं दगा दिल्याने गाव गाठायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. मुंबई सेन्ट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या  प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा घातला आहे. काही अंशी गाड्या सुरु आहेत त्या गर्दी होत असलेल्या मार्गावरच सोडल्या जात आहेत. दुसरीकडे, प्रवाशांकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या संदर्भात विचारणा केली जातेय. मात्र, चालक-वाहक उपलब्ध नसल्यानं गाड्या सुटत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देवाक काळजी रं म्हणणाऱ्या प्रवाशांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. 

एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांमध्ये ४२०० गट आरक्षण आणि ७०० पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे.  सर्वाधिक गाड्या ४,५ आणि ६ सप्टेंबर रोजी सुटणार असल्याने आंदोलन सुरु राहिल्यास प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज अनेक प्रवाशांची तिकीटे आरक्षित आहेत. मात्र, सध्या मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी तासभरापेक्षा अधिक काळ डेपोत थांबून आहेत. 

जादा गाड्यांची संख्या किती?

आज  
मुंबई - 337
ठाणे - 472
पालघर - 187

उद्या 
मुंबई - 1365
ठाणे - 1881
पालघर - 372 

शुक्रवार
मुंबई - 110
ठाणे - 96
पालघर - 70

सोलापूरमध्ये एसटी संपाचा परिणाम

एसटी कर्मचारी संपामुळे सोलापूर विभागातून होणाऱ्या वाहतुकीवर आज काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातून मुक्कामी येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस सोलापुरात मुक्कामी आल्या नाहीत. तर गणेशोत्सवसाठी सोलापूर विभागातील जवळपास 235 बसेस कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल दिवसभरात एसटी संपाचा कोणताही परिणाम न जाणवलेल्या सोलापूर विभागात बुधवारी काहीसा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मात्र,  सकाळपासून सोलापूर आगारतून सुटणाऱ्या गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत. 

नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संमिश्र परिणाम 

नागपूरमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हायला नकार दिल्याने अनेक फेऱ्या नियमित सुरु  आहेत.  संपकाऱ्यांनी नागपूर-इंदोर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ती गाडी सोडण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांची जनसंघ संघटना संपापासून दूर झाल्याने 30 टक्के कर्मचारी संपापासून दूर आहेत. 

बुलढाण्यातली एसटी सेवेवर संपाचा किती परिणाम

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम आता बुलढाणा जिल्ह्यात काही प्रमाणात जाणवायला लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारातील कर्मचारी निम्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाची काही बसेस रस्त्यावर धावत आहेत तर अनेक बसेस रद्द झाल्या आहेत. त्यामुळे नोकरदार असू देत ,शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व आगामी काळात गणेश उत्सव , गौरी गणपती असे उत्सव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सातही आजारातून थोड्या प्रमाणात का होईना बस सेवा सुरू आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून आज पासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आगार बंद आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात करणार आहेत. त्यामुळे दुपारनंतर कदाचित बुलढाणा जिल्ह्यातील बस सेवा आगार बंद पडल्याने ठप्प होण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये एसटी सेवेची स्थिती काय?

एकीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी मागण्यासाठी संप पुकारला आहे. जिल्ह्यामध्ये नऊ आगार असून या संपाचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 50 बसेस लातूर जिल्ह्यात  पाठविण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत आहे. संपाचा हा दुसरा दिवस असून काल 9 आगारांमधून दहा ते बाराच बस सेवा तुरळक सुरू होत्या तर आज सकाळपासून या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

आणखी वाचा

एसटी कर्मचारी संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते तुटून पडले

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??

व्हिडीओ

Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Embed widget