एक्स्प्लोर

एसटी कर्मचारी संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते तुटून पडले

Gunaratna Sadavarte On ST Strike: गुणरत्न सदावर्ते यांनी एसटीच्या संपावरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Gunaratna Sadavarte On ST Strike: मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या  पिलावळांनी हा संप पुकारलाय अशी, टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेनं हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. 

शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळांनी बंद (ST bus strike) करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व लोकं रिटायर्ड हार्ट लोकं आहेत. 'तुम लढो हम कपडे संभालेंगे', अशी ही लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांनी थोतांड सुरु आहे. कोणत्याच परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असं गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात सातवा वेतनाच्या आयोगाची घोषणा होणार होती. तशी चर्चा आमच्यासोबत झाली होती. मात्र, ह्या संघटनांनी करार करा असं सांगितलं, आणि यांनीच हे सर्व थांबवलं. आम्ही 65 हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही, कारण नोटीस नाही. गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे आहेत, असा आम्हाला संशय आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. सातवा वेतन आम्ही मिळवून राहणारच, तो आमचा हक्काचा आहे. सुप्रिया ताई तुम्हाला महाराष्ट्रातलं काहीच माहिती नाही. ह्या संघटनेतील लोकांनी कधीच महामंडळात व्यवस्थित नोकरी केली नाही. यांना करार पाहिजे, टक्केवारी पाहिजे, त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. 'आम्ही डंके की चोट पर सांगतो', सातवा वेतन आयोग घेणारच, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत एसटी कर्मचारी नाही. तसेच एसटी बँकेकडे पैसे आहेत, अडीच हजार कोटी रुपये आहेत आमच्याकडे, आम्ही यात मध्यस्थी करु शकतो आणि शासनाला पैसै देऊ शकतो, असा दावाही गुणरत्न सदावर्ते यांनी केला. 

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे,  प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ganesh Visarjan Special Report : 29 तासांच्या विसर्जन मिरवणुका, पुण्यातील रस्ते दोन दिवस ठप्पABP Majha Headlines : 10 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on OBC Reservation : आम्ही कुणाला पाडायचं हे ठरवलं आहे, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्यZero Hour Guest Center 02 : वन नेशन-वन इलेक्शन प्रक्रियेवर ठाकरे गटाची भूमिका काय? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Embed widget