मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद
माझे पती पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या वृत्तपासून आम्ही काळजीत होतो. केंद्र सरकारपासून सगळ्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा राहिला, संपूर्ण देश आमच्यासोबत उभा होता

नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे भारतीय सैन्य दलाच्य बीएएसएफ (BSF) तुकडीतील जवाने सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला होता. गेल्या 22 दिवसांपासून पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या जवान पी.के.साहू यांना पाकिस्तानने आज भारताच्या स्वाधीन केल्यानंतर साहू यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत देशवासीयांचे आभार मानले. साहू यांच्या पत्नी रजनी यांनी माध्यमांशी बोलताना घटनाक्रम उगडला. तसेच, सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा आम्हाला सकाळी फोन आला, त्यांनीची ही गुडन्यूज दिल्याचे त्यांनी म्हटले. या कठिण परिस्थिती सैन्यातील अधिकारी, सरकार आणि देशावासीय आमच्या पाठीशी उभे होते, त्या सर्वांचे मी आभार मानते. मोदीजी (Narendra modi) ने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया, अशा शब्दात हात जोडून रजनी यांनी केद्र सरकारचे आभार मानले आहेत.
माझे पती पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या वृत्तपासून आम्ही काळजीत होतो. केंद्र सरकारपासून सगळ्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा राहिला, संपूर्ण देश आमच्यासोबत उभा होता. मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे. 22 एप्रिल रोजी आपल्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर, 15 ते 20 दिवसांत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या महिला भगिनींचं कुंकू पुसलं, त्याचा बदला आपण घेतला. मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव या मिशना दिलं होतं, आता माझं कुंकू मला परत मिळवून दिलंय. मोदीजीने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया.. अशा शब्दात पाकिस्तानातून भारतात परतलेल्या बीएएसएफ जवानाच्या पत्नीने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, माझ्या पतीसोबत माझं व्हिडिओ कॉलवरुन संभाषण झालं, ते ठीक आहेत. 22 दिवस पाकिस्तानच्या तावडीत अडकल्याने काही प्रमाणात विकनेस आला असेल, पण त्यांची प्रकृती ठीक आहेत. लवकरच ते घरी येतील, असा विश्वासही रजनी शॉ यांनी व्यक्त केला.
23 एप्रिल रोजी बॉर्डर क्रॉस
भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 22 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते. अखेर आज मायभूमीत त्यांचं आगमन झाल्याने देशवासीयांनी आनंद व्यक्त केला. तर, शॉ कुटुंबीयांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले होते.
#WATCH | पश्चिम बंगाल: BSF जवान पूर्णम कुमार शॉ की पत्नी रजनी शॉ ने कहा, "आज सुबह जब हमें फोन आया कि चिंता मत कीजिए, आपके पति भारत आ गए हैं और वह बिल्कुल ठीक हैं, तो हम बहुत खुश हुए। मैंने अपने पति से भी बात की और वह शारीरिक रूप से स्वस्थ हैं... उन्होंने (ममता बनर्जी) मुझसे कहा… https://t.co/WtglJvLHlU pic.twitter.com/yiXRZanYAE
— ANI_HindiNews (@AHindinews) May 14, 2025
जवान पाकिस्तानात कसा पोहोचला?
नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ यांची सुटका होऊ शकली नव्हती.

























