एक्स्प्लोर
Advertisement
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील 'हाय रिस्क' व्यक्तींसाठी चाचणी पद्धतीत सुधारणा
'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही किमान 7 दिवसांच्या विलगीकरणानंतर करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.
मुंबई : कोरोना 'कोविड 19' आजाराची लागण झालेल्या अनेक बाधित व्यक्तींमध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे दिसतातच असे नाही. अनेकदा लक्षणे न दिसणाऱ्यांची (Asymptomatic Patients) वैद्यकीय चाचणी केली असता, ती लागण झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीचे 7 दिवस 'फॉल्स निगेटिव्ह' येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जे वस्तुतः बाधित आहेत, परंतु त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र 'निगेटिव्ह' येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत 'फॉल्स निगेटिव्ह टेस्ट' असे संबोधले जाते. या पार्श्वभूमीवर ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कातील 'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही किमान 7 दिवसांच्या विलगीकरणानंतर करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.
वरील नुसार ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह' आली आहे, अशा रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून त्यानुसार नियमितपणे कार्यवाही सुरू आहे. तथापि, अशा गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी यापूर्वी विलगीकरणानंतर लगेचच करण्यात येत होती. मात्र, वरील तपशीलानुसार आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून या गटातील व्यक्तींची विलगीकरणातील 7 दिवसानंतर वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
'कोरोना कोविड १९' प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. यानुसार १३ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईत तब्बल 27 हजार 397 चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच तारखेपर्यंत देशात एकूण २ लाख १७ हजार 554 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ देशातील एकूण चाचण्यांच्या 12.59 टक्के एवढ्या वैद्यकीय चाचण्या या केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement