एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण, अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यातून दाखल झालेल्या दोन्ही याचिका सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत. मात्र सोहराबुद्दीन शेख प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सीबीआयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमित शाह यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न देण्याचं ठरवल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतील वकिलांची एक संघटना बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.
वकिलांच्या याच संघटनेच्यावतीने जस्टिस लोया यांच्यामृत्यूसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. लोया यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीय. या याचिकेवरही मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सूर्यकांत लोकरे यांनी दाखल केलेली याचिकाही सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करून घेतली आहे.
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण
गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
जॅाब माझा
Advertisement