एक्स्प्लोर

... तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं; रेमडेसिवीरच्या राजकारणावरुन संजय राऊतांचा विरोधी पक्षांवर निशाणा

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वरुन राजकीय चिखलफेक सुरु आहे. अशातच आता संजय राऊत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाने मुख्यंमंत्र्यांसोबत चर्चा केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

मुंबई : देशातील कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स, ऑक्सिजनसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशातच सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन राजकीय घडामोडी सुरु आहेत. याबाबत बोलताना विरोधी पक्षाने मुख्यंमंत्र्यांसोबत चर्चा केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम सुरु होते, ती लपवाछपवी आता बंद झाली आहे; असा टोलाही लगावला आहे. 

रेमडेसिवीरवरुन राज्यात सुरु असलेल्या राजकारणासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "विरोधी पक्षाने मुख्यंमंत्र्यांसोबत चर्चा केली पाहिजे. जर त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि ते सरकारला डावलून रेमडेसिवीर मिळवू शकत असतील तर ते राज्यासाठी मिळवण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं." रेमडेसिवीर प्रकरणी चौकशी व्हावी का? असं विचारलं असता जंयत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे संकेत दिले असल्याचंही संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं आहे. 

संजय राऊत बोलताना म्हणाले की, "एखाद्या मोठ्या युद्धात बॉम्बमुळे जसं सगळं उद्ध्वस्त होतं तसं सगळं उद्ध्वस्त होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम सुरु होते, ती लपवाछपवी आता बंद झाली आहे. त्याचाही स्फोट झाल्याने आता जागोजागी अनेक राज्यांमध्ये चिता भडकलेल्या दिसत आहेत. रस्त्यांवर रुग्ण दिसत असून जर हे प्रकरण वाढत गेलं, नियंत्रण ठेवलं नाही आणि पुन्हा पुन्हा परिस्थिती लपवत राहिलो तर देशात अराजक माजेल असं चित्र स्पष्ट दिसत आहे."

"प्रत्येक राज्यात काय चाललं आहे? देशाची परिस्थिती काय आहे? सरकार काय करत आहे? राज्यांना काय मदत आवश्यक आहे? देशाची आर्थिक, आरोग्य स्थिती काय आहे? याविषयी सोशल डिस्टन्सिंग पाळून एक विशेष अधिवेश बोलावणं गरजेचं आहे. देशाची परिस्थिती गंभीर असल्याचं सर्वांनी मान्य केलं आहे. देशाच्या संकटावर चर्चा होणं गरजेचं आहे.", असंही संजय राऊत बोलताना म्हणाले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घाईत लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नाही, असं वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाऊन करण्याची गरज नाही असं वाटत असेल तर जी माणसं मरत आहेत, ऑक्सिजन आणि बेडशिवाय तडफडत आहेत. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Coronavirus Pandemic in India : कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा; शिवसेनेची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget