एक्स्प्लोर
योगायोग की राजकीय षडयंत्र; महाराष्ट्राच्या चित्ररथावरुन राजकारण तापलं
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापलं. शिवसेना नेते खासदरा संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापलं आहे. विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यामागे राजकीय षडयंत्र असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. तर, महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे, आगपाखड शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात यावेळी महाराष्ट्राच्या रथाचा समावेश नाही. मला ही बातमी ऐकूण खुप दुःख झालं आहे. कारण नेहमी बक्षिस मिळवणारे आपण यावर्षी सहभागी नाही. दरवर्षी महाराष्ट्राकडून आपला चित्ररथ दिल्लीला जातो. आपल्याला बक्षिसही मिळते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सरकार कोणाचंही असुदेत, हा कुठलाही सरकारी किंवा राजकीय विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. ज्यावेळी महाराष्ट्र डावलला जातो. जे मुल बोर्डात पहिलं येतं ते नापास झाल्यावर आईवडिलांना धक्का बसतोच ना? त्यामुळे मला याचं आश्चर्य वाटतं. ही निवड फार पारदर्शकपणे होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर माझा विश्वास बसत नाहीय. कारण, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य यात नाहिय. त्यामुळे हा योगायोग आहे, की राजकीय षडयंत्र, अशी शंकाही सुळे यांनी उपस्थित केली.
सुधिर मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर - आम्ही सरकारमध्ये आणि मुनगंटीवार विरोधात आहेत, त्यामुळे त्यांनी टीका करणे साहजिक आहे. आमचं दडपशाहीचं सरकार नाहीय. विरोधकांनी दिलदारपणे टीका करावी, तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. भाजप आणि आमच्यात हाच फरक, असल्याचे सांगत टीकेला कामातून उत्तर देऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकार कोणाचंही असलं तरी महाराष्ट्राला डावलल्याने मला वाईट वाटले. यावर्षीचा चित्ररथाचा विषयही खूप चांगला असल्याचे सुळे यांनी सांगितले. दुसऱ्यांच्या घरात लक्ष देण्याची मला सवय नाही - देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे माझं माझं तिकीट कापलं गेलं, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना विचारले असता मला दुसऱ्यांच्या घरात लक्ष देण्याची सवय नाही. प्रत्येक पक्षाने काय करावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे, या मताची मी आहे, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी यावर बोलण्यास टाळले.प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला.अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2020
आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी आपला राग व्यक्त केला आहे. तर, महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? अशी विचारणा संजय राऊत यांनी भाजपला केली आहे. हेही वाचा - खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण Chitrarath | महाराष्ट्राच्या चित्ररथावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला सवाल | ABP Majhaमहाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement