SSR Case SC Verdict | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र आहे. जर मुंबई पोलिसांना आपल्याच राज्यातील राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करत आहेत.' अशी टिका केली आहे.
मुंबई : सुशांत सिहं राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपास हा अत्यंत प्रामाणिकपणाने केला आहे. असंही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, 'सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा जो निर्णय दिला आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही'.
मुंबई पोलिसांनी केलेल्या याप्रकरणाच्या तपासा विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात, देशभरात आहे. जर मुंबई पोलिसांना आपल्याच राज्यातील राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करत आहेत.' अशी टिकाही संजय राऊत यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय म्हणजे षडयंत्र : संजय राऊत
सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतं.
या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.
सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :