एक्स्प्लोर
एलफिन्स्टन दुर्घटना : हळदणकर कुटुंबियांना शिवसेना आमदाराकडून मदत
शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी हळदणकर कुटुंबाला एक लाख रुपयांचा मदतीचा चेक सुपूर्द केला.
मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत वरळीतील हळदणकर कुटुंबियांनी आधारस्तंभ गमावला. मयुरेश हळदणकर याचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. हळदणकर कुटुंबाची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी हळदणकर कुटुंबाला एक लाख रुपयांचा मदतीचा चेक सुपूर्द केला.
काल एबीपी माझावर एलफिन्स्टन दुर्घटनेत बळी पडलेल्या मयुरेशच्या कुटूंबाची अवस्था दाखवल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होते आहे. मयुरेश ज्या वरळी भागात राहत होता, तिकडचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी हळदणकर कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले आणि एक लाख रुपयांची भेट दिली.
खरं तर ही मदत त्यांच्यासाठी खूप तोकडी आहे. त्यामुळे आमदार सुनील शिंदे यांनी केंद्र सरकारने मयुरेशच्या बहिणीला रेल्वेमध्ये नोकरीत घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांची आज तातडीने भेट घेतली. जर रेल्वे प्रशासन कमी पडत असेल तर तातडीने मयुरेशच्या बहिणीला सरकारी सेवेत घ्यावं अशी मागणी केली.
हळदणकर कुटुंबाची अवस्था काल एबीपी माझानं दाखवली होती. त्यानंतर आता अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.
29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबीयांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला. वरळीच्या 80 नंबरच्या बीडीडी चाळीत छोट्याशा खोलीत मयुरेश हळदणकर कुटुंबासोबत राहायचा.
घरात तीन-चार लोक मोठ्या मुश्किलीनं झोपतील एवढीच जागा. वडिलांना नोकरी नाही. आईचं सततचं आजारपण. हळदणकर कुटुंबाचा गाडा एकट्या मयुरेशच्या छोट्या खांद्यावर होता.
संबंधित बातमी : 'एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मयुरेशच्या बहिणीला सरकारी नोकरी द्यावी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement