Sanjay Raut : ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार : संजय राऊत
जे महाराष्ट्रद्रोही आहेत, अशा लोकांच्या विरोधात मी अशीच भाषा वापरणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मुंबई आणि महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठी भाषा ही सक्तीची असू नये म्हणून किरीट सोमय्या हे कोर्टात गेले होते. त्यांच्या विरोधात मी शिवराळ भाषा वापरली. जे महाराष्ट्रद्रोही आहेत, अशा लोकांच्या विरोधात मी अशीच भाषा वापरणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले. सोमय्या यांचे जर तुम्ही समर्थन करणार असाल, तर त्यांना तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा, त्यांच्यापुढे झुका आम्हाला काही म्हणायचे नाही असे संजय राऊत मनसे प्रमुख राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजत आहे. केंद्राकडून त्यांना अभय मिलाल्यामुले त्यांचा भोंगा वाजू लागला आहे. निराशेतून त्यांचे हे भोंगे वाजत असल्याचे संजय राऊत म्हणाले. मी ज्या संदर्भात शिवराळ भाषा वापरली त्याचे राझ ठाकरेंनी कौतुक करायला पाहिजे होते. कारण ते मराठी अभिमानी म्हणून फिरवत होते. मराठीचे तारणहार आम्हीच आहोत असे ते सांगत होते. त्यामुळे त्यांनी जर माझ्या भाषेचं कौतुक केलं असत तर त्यांच खरे मराठी भाषेचं प्रेम दिसले असते असे राऊत म्हणाले. किरीट सोमय्या यांच्याबद्दल मी शिवराळ भाषा का वापरली याचा जर राज ठाकरेंनी अभ्यास केला असता तर माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती असेही राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यासह मुंबईतील काही बिल्डर यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे प्रेझेंटेशन तयार केले आहे. मुंबईवर मराठी माणूस आणि शिवसेनेचा हक्क असून नये म्हणून या लोकांची कारस्थाने सुरु आहेत. हे समजल्यावर माझ्या तोंडून संतापून शिवी बाहेर पडली असेल. पण मी याला शिवी म्हणत नाही. याबाबत मराठी जनता मला माफ करेल असे राऊत म्हणाले. माझ्या भाषेचा शिवसेनेला गर्व असल्याचं त्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये हडप करणार किरीट सोमय्या तुम्हाला प्रिय असतील तर तुम्ही त्यांना जरुर बोलवा. त्यांना तुमचं एखाद पदक देऊन टाका असेही राऊत राज ठाकरेंना म्हणाले. तुमचा भंपकपणा चालला असल्याचेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- दिवा विझताना मोठा होतो ; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर
- राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात ; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल