एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
मुंबई: 'युती आम्ही तोडलेली नाही ती खडसे साहेबांनीच तोडली, पण युती तोडण्याचे शिल्पकार आता कुठे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता युती तोडण्याचं पाप कुणीही करु नये' अशा शब्दात शिवसेना नेते अनिल परब यांनी आज 'माझा कट्टा'वर आपली भूमिका स्पष्ट केली.
'कुणाच्या हट्टामुळे युती तुटत नाही'
'भाजपकडून असं म्हटलं गेलं होतं की, आदित्य ठाकरेंच्या बालहट्टमुळे युती तुटली होती. पण असं कुणाच्या हट्टामुळे युती तुटत नाही. जनता, कार्यकर्ते यांच्याकडे पाहावं लागतं. लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. त्यातूनच हे निर्णय होत असतात.' असंही परब म्हणाले.
'युती तोडण्याचं पाप कुणी करु नये'
'युती आमच्याकडून तुटली नव्हती तर ती भाजपनं तोडली होती. त्यामुळे आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये. जेव्हा युती तुटली होती तेव्हा आम्हाला दु:ख झालं होतं. ज्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही वर्षानुवर्ष काम केलं होतं त्यांच्यासमोर आम्हाला लढावं लागलं होतं.' असं अनिल परब म्हणाले.
'युती झाली तर ती फक्त भाजपशीच, इतर कुणाशीही नाही'
'शेवटी हिंदुत्वाच्या आधारावर ही युती झाली होती. त्यामुळे युतीच्या पाठीशी एक विचार आहे. शिवसेनेनं जर युती केली तर ती फक्त भाजपशी होईल. इतर कुणाशीही होणार नाही.' असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या युतीबाबत अनेक बैठकी सुरु आहे. युतीच्या चर्चेत शिवसेनेकडून इतर नेत्यांसह अनिल परबही सहभागी होत आहेत.
अनिल परब यांचे 'माझा कट्टा'वरील महत्वाचे मुद्दे
भाजपशी आज जागावाटपाबाबत चर्चा झाली- अनिल परब
भाजपशी आज जागावाटपाबाबत चर्चा झाली- अनिल परब
युतीच्या चर्चेत खोडा यावा असं कोणतंही पाऊल उचललं नाही- अनिल परब
कोणत्या जागा भाजपला हव्या, याबाबत अजून चर्चाच सुरु झाली नाही- अनिल परब
युती ही जिंकण्यासाठी होते, त्यामुळे जिंकणाऱ्या जागा समजुतीने ठरणं आवश्यक- अनिल परब
युतीच्या चर्चेच्या शेवटच्या दोन फेऱ्या पक्षश्रेष्ठींच्या- अनिल परब
शिवसेनेवर महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत?- अनिल परब
महापालिकेबाहेर नाव न घेता राजकीय विधानं करण्याला शिवसेनेचा आक्षेप- अनिल परब
किरीट सोमय्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेत नाही, ती भाजपची भूमिका नाही- अनिल परब
आशिष शेलार महापालिकेत भाजपचे गटनेते होते, तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत?- अनिल परब
शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वावर झाली, तुटलेली युती राजकीय समीकरणामुळे झाली- अनिल परब
सातत्याने निवडणुका लागू नयेत, म्हणून युती होणं आवश्यक होतं- अनिल परब
फेरनिवडणूक होऊ नये, म्हणून युती होणं आवश्यक होतं- अनिल परब
भाजपने 50 टक्के जागांची मागणी केली, म्हणून आम्ही थेट 25 टक्क्यांवर आणणार नाही- अनिल परब
नगरपालिकांमध्ये भाजप नंबर 1 असेल, तर मतांची टक्केवारी शिवसेनेची वाढली आहे- अनिल परब
गेल्यावेळी खडसेंनी युती तोडली हे त्यांनी स्वत: मान्य केलं- अनिल परब
युती तोडण्याचं पाप कुणी करु नये, आता खडसे कुठे आहेत हे सर्वांना माहित आहे- अनिल परब
युतीसाठी मनसेचा प्रस्ताव आला की नाही माहित नाही, पण युती झालीच तर शिवसेना-भाजपची होईल- अनिल परब
#DIDYOUKNOW ही टॅगलाईन म्हणजे आम्ही केलेली कामं मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न- अनिल परब
मुंबईकरांना माहित नसलेली कामं #DIDYOUKNOW टॅगलाईनद्वारे सांगण्याचा प्रयत्न- अनिल परब
शिवसेना हृदयापासून काम करते, त्यामुळे त्याला चांगले-वाईट अनुभव येत राहतात- अनिल परब
उपलब्ध साधनसामुग्रीत महापालिकेने जनतेसाठी जे केलं आहे, ते उत्तम आहे- अनिल परब
मुंबईकरांना 24 तास मोफत पाणी ही संजय निरुपम यांची योजना असेल, तर त्यांनी ती दाखवावी- अनिल परब
संजय निरुपम यांचं 24 तास पाणी देण्याचं वक्तव्य राजकीय, पाणी देणं आणि विरोधकांना पाणी पाजण्याचं काम शिवसेनेचं- अनिल परब
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास झाला, त्याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला- अनिल परब
तावडे, शेलार यांच्याशी मैत्रीचे संबंध, राजकीय मतभेद असले तरी मैत्री कायम- अनिल परब
संबंधित बातम्या:
युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला
युती केल्यास नुकसान, शिवसेनेच्या सर्वेक्षणातून अंदाज
…म्हणून युतीसाठी नेत्यांचा सावध पवित्रा
महापालिका दुभती गाय नाही, पारदर्शकताच युतीचा मुद्दा : मुख्यमंत्री
दहा महापालिका निवडणुकांसाठी फडणवीसच भाजपचा चेहरा
‘ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर’, माझा कट्ट्यावर दानवेंचं स्पष्टीकरण
युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक
…म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत
स्वबळावर लढल्यास भाजपला 100+ जागा, पक्षाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
मुंबई जिंकण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांची राजकीय थडगी इथेच बांधली: शिवसेना
शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचा पारदर्शी अजेंडा नेमका काय?
‘युती नको, विकास हवा’…ठाण्यात भाजपची पोस्टरबाजी
भाजपच शिवसेनेचा शत्रू नंबर 1, नागपुरात शिवसैनिकांचा सूर
शत्रू कोण हे पाहू नका, लढाईसाठी सज्ज राहा : मुख्यमंत्री
स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो, रावसाहेब दानवेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement