Aditya Thackeray : सुनावणीला हजर राहण्यासाठी कंत्राटदाराची BMCकडे आणखी वेळेची मागणी; आता काय करणार? आदित्य ठाकरेंचा महापालिकेला सवाल
BMC Road Construction : मुंबईतील रस्त्यांची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेने नोटिस दिली होती. त्यानंतर आता कंत्राटदारांनी त्यासाठी वेळ मागितला आहे.

मुंबई : शहरातील रस्त्याची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे (BMC) सुनावणीला हजर राहण्यास वेळ मागितला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराचं मुंबई महापालिका नेमकं काय करणार हे स्पष्ट करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.
मुंबई शहरातील रस्त्याची काँक्रिटकरणाची कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस देऊनसुद्धा कंत्राटदाराने सुनावणीला हजर राहण्यास वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची काम रखडल्याने मुंबई शहरातील रस्त्याची काम करणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेने 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवून या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेला उत्तर प्राप्त झाल्यानंतर यातून मुंबई महापालिकेचे समाधान न झाल्याने कंत्राटदाराला सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले.
आदित्य ठाकरे आणि भाजपच्या माजी नगरसेवकाची तक्रार
मात्र आज सुनावणी असताना या कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वारंवार तक्रारीनंतर मुंबई महापालिकेकडून रखडलेल्या रस्ते कामांची दखल घेण्यात आली.
जानेवारी महिन्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा कार्यादेश दिल्यानंतरही मुंबई शहरात रस्त्याची काम सुरू न झाल्याने बीएमसी ने कंत्राटदारांना अंतिम नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये कंत्राटदाराची सर्व अनामत रक्कम जप्त करून काम काढून घेण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.
A full week after the notice period ended for the errant contractor friend of the khoke sarkar, apparently today was the final hearing on the contractor’s termination.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 3, 2023
I’m curious to know officially from the @mybmc about what happened today.
• Did the contractor’s hearing…
बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरला या कंत्राटदाराला अंतिम नोटीस देण्यात आली होती. आता रस्त्यांची काम देण्यात आलेली कंत्राटदार हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असून भाजपाच्या माजी नगरसेवकानी आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
खरंतर रस्त्यांची कामं देण्यात आलेल्या पाचही कंत्राटदारांना जानेवारीपासून पावसाळ्याआधी रस्त्याची काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र हवी तेवढी काम सुरू झाली नाहीत. दुसरीकडे आता पावसाळा संपल्यानंतरसुद्धा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची काम होत नसल्याने 9 ऑक्टोबरला मुंबई शहराच्या रस्त्याच्या काँक्रीट करण्याचं कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यात याच कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण न केल्याने दहा कोटींचा दंड ठोठावला होता. त्यानंतर तातडीने काम सुरू करू अशा आश्वासन कंत्राटदाराने दिलं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिका या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई करणार हे पहावे लागेल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
