एक्स्प्लोर

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच, ‘सामना’तून खडसेंवर वार

खडसेंनी सत्तेचा वापर करुन मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच सत्ता आज खडसेंवर उलटली आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

मुंबई: भाजप नेते एकनाथ खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातलं कर्माचं फळ याच जन्मात फेडायचं असतं, अशी तिखट टीका शिवसेनेने केली. ‘सामना’ या मुखपत्रातून सेनेने खडसेंवर हल्लाबोल केला. खडसेंनी सत्तेचा वापर करुन मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच सत्ता आज खडसेंवर उलटली आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे. “खडसे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंचावर दिसतात. चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत”, असं टीकास्त्र ‘सामाना’तून सोडलं आहे. खडसे हिरो बनायला निघाले होते, पण राजकीय मंचावर त्यांना साईड रोल मिळाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तोही काढून घेतला. त्यामुळे खडसे आज भाजपच्या राजकारणातून बाद झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे, असं सामनात नमूद करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत

व्हिडीओ

Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
Embed widget