राणा दाम्पत्याला अटक; चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसात गुन्हा, आज कोर्टात हजर करणार
Navneet Rana and Ravi Rana Arrest : राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांत गुन्हा, आज कोर्टात हजर करणार
![राणा दाम्पत्याला अटक; चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसात गुन्हा, आज कोर्टात हजर करणार Shiv Sena vs Navneet Rana and Ravi Rana Arrested by Khar police Will appear in Bandra court today Maharashtra राणा दाम्पत्याला अटक; चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसात गुन्हा, आज कोर्टात हजर करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/22/2688167c34d2839488cf1fbc0635a16f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navneet Rana and Ravi Rana Arrested : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याप्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. आज राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर 'कलम 153 अ' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. एखादं प्रक्षोभक वक्तव्य करुन जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जात असेल तेव्हा हे कलम लावलं जातं. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्यानं आरोपीला न्यायालयासमोर हजर करावं लागतं. पोलीस कोठडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करु शकतात.
दरम्यान एकीकडे राणा दाम्पत्याला खार पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्यानंतर दुसरीकडे राणा दाम्पत्यानं उलट तक्रार नोंदवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात राणा दाम्पत्यानं तक्रार दाखल केली आहे. याशिवाय घरावर हल्ल्या केल्याचा आरोप करत शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांनी शिवसैनिकांना चिथवल्याचं आणि मुख्यमंत्र्यांनी जीवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता खार पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
खासदार नवनीत राणा आणि आमदार यांनी संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी अॅम्ब्युलन्स आणली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई येऊन मातोश्री (Matoshree) बंगल्यावर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार असा निर्धार राणा दाम्पत्यानं केला होता. त्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दोघंही गनिमी काव्यानं मुंबईत आले होते. पण, काल (शनिवारी) दिवसभरात ते आपल्या घरातून बाहेर पडू शकले नाहीत. कारण, मुंबईत मातोश्री बंगला परिसर आणि नवनीर राणा यांचं निवासस्थान असलेल्या खारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. शिवसैनिकांनी एकच गर्दी करत खडा पहारा दिला. नवनीत कौर आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जावून हनुमान चालिसा पठणचा निर्धार केला होता. पण, शिवसैनिक आक्रमक झाले, त्यांच्या खारमधील घरासमोरही जोरदार घोषणाबाजी झाली. आणि संध्याकाळनंतर दोघांनीही पोलिसांनी अटक केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)