'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक, केले धडाधड ट्वीट
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra Mumbai)संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
Bhagat Singh Koshyari controversial statement : महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra And Mumbai)संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut tweet) हल्लाबोल केला आहे.
धडाधड चार ट्वीट करत राज्यपालांवर टीका
धडाधड चार ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
ऐका .. ऐका... pic.twitter.com/dOvC2B0CFu
काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता...काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, असं राऊतांनी म्हटलं आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल राऊतांनी केला आहे.
काय ती झाडी..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
काय तो डोंगर..
काय नदी..
आणि आता...
काय हा मराठी माणूस ..
महाराष्ट्राचा घोर अपमान!
50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..
जय महाराष्ट्र... pic.twitter.com/U30CdS0TSW
राऊतांनी म्हटलं आहे की, आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आता तरी..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2
राज्यपालांनी नेमकं काय म्हटलं आहे...
कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.