एक्स्प्लोर

अशा अड्ड्यावर कोणी पत्ते पिसत असेल तर पिसावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच : संजय राऊत

महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसं काम करायला हवं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई : "कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच "विरोधी पक्षाला वाटत असेल की असं राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत," अशी टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसंच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत राज्यपालांसह विरोधकांवर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट करुन राज्यपालांवर टीका केली होती. "राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!," असं ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. यानंतर विरोधकही राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत.

मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार

'राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठाम उभं राहावं' संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजभवनात राज्यपाल अधिकाऱ्यांना परस्पर बोलून यंत्रणा राबवतात. मुख्यमंत्र्यांचे आदेश वेगळे असू शकतात, राज्यपालांचे आदेश वेगळे असू शकतात. त्यामुळे ही कोरोनोसंदर्भात एक गोंधळ निर्माण होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आम्ही नक्कीच बोलणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मुदत 27 मे रोजी संपणार आहे. याबाबत अनेक बातम्या, समज, गैरसमज पसरत आहे. यामुळे प्रशासनामध्ये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे थांबवण्याचं काम राजभवनाचं आहे. या गोंधळाचा केंद्रबिंदू राजभवन आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री  होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसं काम करायला हवं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे."

कायदेशीरदृष्ट्या ठाकरे सरकार चूक करणार नाही : संजय राऊत संजय राऊत म्हणाले, "राजकीय फायद्या-तोट्याचं काम कोणी करु नये. राजकारण करु नका असं उद्धव ठाकरे कायम सांगत असतात. सर्वांनी एकत्र यावं ही लोकांचीही भावना आहे. तरीही असं राजकारण होत असेल तर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात काम करत आहेत. अशा लोकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे." तसंच कायदेशीरदृष्टया ठाकरे सरकार कोणतीही चूक करणार नाही. याआधी मुख्यमंत्री असे आमदार झाले आहेत याची अनेक उदाहरणं आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

...तर डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते : आशिष शेलार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील...दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा... असं आशिष शेलार म्हणाले.

विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. 9 एप्रिल रोजी राज्य सरकारने घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अजूनही राज्यपालांची प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते? कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत बोलताना 17 एप्रिल रोजी सांगितलं होतं की, "उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. यामुळे घटनात्मक पेच राज्यात निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात दोन सदस्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवली होती, मात्र त्याला देखील राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या प्रस्तावाही राज्यपालांकडे प्रलंबित आहे."

Maharashtra Politics | ...अशा अड्ड्यावर कितीही पत्ते पिसा, मुख्यमंत्री ठाकरेच : संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्या

Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget