एक्स्प्लोर

Shiv Sena Clash : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, शिवसैनिक एकनिष्ठेने भिडणारच...

Shiv Sena Clash : शिवसैनिक एक निष्ठेने भिडणारच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

Shiv Sena Clash : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात (Shivaji Park) असलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा  (Clash between Shiv sena UBT and Shiv Sena Shinde Faction) झाला. या राड्यात दोन्ही बाजूने घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. त्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिवसैनिक एक निष्ठेने भिडणारच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे.त्याचे पावित्र्य राखा याला हवे.छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृति स्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाहीं.त्या प्रमाणे  शिवतीर्थावर स्मृती स्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल.शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच! जय महाराष्ट्र


बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.  

महिलांना धक्काबुक्की, शिंदे गटाचा आरोप 

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतक म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. 

ठाकरे गटाने काय म्हटले?

शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget