![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? शिशिर शिंदेंच्या पत्रानंतर शिस्तभंग कमिटीकडे अर्ज दाखल
Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेचा फायदा हा रवींद्र वायकरांना न होता तो ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांना झाला असल्याचा आरोप करण्यात येतोय.
![Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? शिशिर शिंदेंच्या पत्रानंतर शिस्तभंग कमिटीकडे अर्ज दाखल shiv sena action against gajanan kirtikar application filed with disciplinary committee mumbai north west lok sabha amol kirtikar vs ravindra waikar election marathi news Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? शिशिर शिंदेंच्या पत्रानंतर शिस्तभंग कमिटीकडे अर्ज दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/69e14d9a7299800f187a08bfca48444e171638394386593_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकरांवर (Gajanan Kirtikar) आता पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. गजानन किर्तीकर यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेचे सर्व नेते नाराज असल्याची माहिती असून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता शिस्तभंग कमिटी काय निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.
उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत होती. 20 मे रोजी या ठिकाणी मतदान पार पडलं आहे. त्यावेळी गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही एकाच कार्यालयात बसून काम करत होते, त्याचा फायदा अमोल कीर्तिकरांना झाला असा आरोप शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केला. शिशिर शिंदे यांनी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
शिशिर शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मतदानानंतर सार काही शांत शांत आहे असं वाटत असतानाच नुकतेच शिवसेना शिंदे गटात आलेले नेते शिशिर शिंदे यांनी एक पत्र एकनाथ शिंदेंना लिहिलं. खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांनी केला, पितापुत्र एकाच कार्यालयातून पक्ष चालवायचे त्याचा फायदा शिवसेनेला कमी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जास्त झाला तसंच गजाभाऊ पुत्रप्रेमाने आंधळे झाले अशी टिपण्णीही शिशिर शिंदे यांनी केली. खासदार गजानन कीर्तिकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
मी ठाकरेंकडे कधीही जाणा नाही, गजानन कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
माझ्या निधीच्या वापराचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून अमोल कीर्तीकर करतात. मात्र मी भूमिका वेगळी घेतल्यानंतर अमोल कीर्तीकरांनी माझ्या कार्यालयात बसणं बंद केलं असं स्पष्टीकरण खासदार गजानन कीर्तीकरांनी दिलं आहे. तसेच आपण मातोश्रीमध्ये परत जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिशिर शिंदे कोण असं म्हणायची वेळ
शिशिर शिंदे यांच्या आरोपांवर अमोल कीर्तिकर यांनीही कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. शिशिर शिंदे यांच्या पक्ष बदलण्यावरही त्यांनी बोट ठेवलं. गजानन किर्तीकर खासदार असताना 10 पैकी 9 वर्षे पक्ष म्हणून आपण त्यांच्यासोबतच होतो. त्या 9 वर्षांच्या कामाचं श्रेय घेतलं तर काय चूक केली असं अमोल कीर्तिकर म्हणाले. तसंच 10 वर्ष वडिलांनी केलेल्या कामाचा आपल्याला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)