एक्स्प्लोर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार : राज्यपालांच्या हस्ते खेळाडूंचा झाला सन्मान

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात खेळाडूंना देण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह क्रीडा मंत्री विनोद तावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई : राज्यात खेळाला अधिक गतिमान करून क्रीडा क्षेत्राला रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पहिले पूर्ण विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे. यातून राज्यातील क्रीडा विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात आज काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उपस्थित इतर मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात खेळाडूंना देण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह क्रीडा मंत्री विनोद तावडे, क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त नरेंद्र सोपल, क्रीडा संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडू सलोनी सापळे, महेश जोशी यांच्याकडून पुरस्काराची रक्कम शहीदांच्या परिवाराला
यावेळी शिवाजी पार्क समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख आणि मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पुण्यातील बुद्धिबळ खेळाडू सलोनी सापळे आणि स्कॉश खेळाडू महेश जोशी यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या दोन शहीदांना मदत म्हणून दिली. पुलवामा मध्ये झालेला हल्ला हा अतिशय दुर्दैवी असून यामुळे सर्व भारतीयांची मन सुन्न झाली आहेत. त्यांना मदत म्हणून आपल्या पुरस्काराची  लाख 2 हजार रुपये देत असल्याचे पुण्याची बुद्धिबळपट्टू सलोनी सापळे आणि स्कॉश खेळाडू महेश जोशी यांनी सांगितले.
क्रीडापटूंना मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन 
राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी म्हणाले की, खेळांप्रति महत्वाकांक्षा, वचनबद्धता आणि निराकरण क्षमता असल्यास आपण खेळ विश्वातील सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो. पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक गेम आणि पुढील दोन वर्षात आशिया गेम्स चीनमधील हुआंगझूमध्ये होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतातील क्रीडापटूंना  मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन राज्यापल  सी. विद्यासागर राव यांनी यावेळी केले. येणाऱ्या काळात तरुण व आश्वासक खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी निवृत्त खेळाडूंची क्षमता वापरली जाणे आवश्यक असल्याचे श्री. राव यांनी सांगितले. आपली सर्वात मोठी ताकद हे आपले समर्पित प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त खेळाडू आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी देशाला आणि राष्ट्राला अभिमान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या खेळाडू, खेळाडू प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, दिव्यांग खेळाडु यांप्रति अभिमान व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातल्या सर्वच तरुण खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यात महाराष्ट्र  क्रीडा आणि खेळांमध्ये आपले नेतृत्व  सिद्ध करेल, अशी आशा व्यक्त केली. मंत्री तावडे यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पालक मुलांना खेळामध्ये करीअर करु देण्यास सहज तयार होत नाहीत. पण अलीकडच्या काळात पालकांचाही क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.  आज  विदयार्थ्यांनी खेळात चांगले प्रावीण्य मिळविले तर तो विदयार्थी भविष्यात खेळामध्येच चांगले करीअर करु शकतो. शारीरिक कौशल्ये आणि क्षमता भरपूर असलेल्या मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. नव्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता असते. क्रीडा मंत्री म्हणून मला सांगण्यास आनंद वाटतो की,आज महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याबरोबरच खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार शासकीय सेवेत थेट नियुक्तीही देण्यात येत असल्याचे  तावडे यांनी यावेळी सांगितले. सन 2017-18 या वर्षांतले शिवछत्रपती पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. मल्लखांबसाठी  योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात आले. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना वितरीत करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो).
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget