एक्स्प्लोर
पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : शरद पवार
देशात जर जन्मला तर त्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं त्याला का बोलायला सांगितलं जातं. या पूर्वी मी कधी मॉब लिचिंग हा शब्द ऐकला नव्हता, असे पवार म्हणाले.

मुंबई : पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार बोलत होते. देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. देशात जर जन्मला तर त्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं त्याला का बोलायला सांगितलं जातं. या पूर्वी मी कधी मॉब लिचिंग हा शब्द ऐकला नव्हता, असे पवार म्हणाले. राज्यात ओला दुष्काळ आला. एवढी पूरस्थिती आली पण देशाचे प्रमुखांनी याची पाहणी देखील केली नाही, असा आरोप पवार यांनी केला. नवीन एक पार्टी आली आहे वंचित बहुजन आघाडी. वंचित ज्या पद्धतीने जात आहे त्यांची नियत साफ नाही असं चित्र आहे. वंचितकडून सेक्युलर आहे असं सांगितलं जात आहे, मात्र फायदा भाजपला करत आहेत, असेही पवार म्हणाले.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















