शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं! राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) जोडल्या प्रकरणी निलेश आणि नितेश राणे या बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडतील असं भाष्य केल्याची एफआयआर कॉपीत नोंद केली आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारण शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारीत म्हटलं आहे की, निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस आणि पाकिस्तानचा एजंट असल्याचं ट्वीट केलं होतं. निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे आणि निलेश राण हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करुन तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसान करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्यानं शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :