Mahavikas Aghadi : शरद पवारांचा तडकाफडकी उद्धव ठाकरेंना फोन, मविआत 'या' तीन जागांवरून तिढा कायम
Mahavikas Aghadi : राज्यातील तीन जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत तिढा कायम आहे. यावरून शरद पवार यांनी तडकाफडकी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) रस्सीखेच सुरु आहे. राज्यातील तीन जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याचे चित्र आहे. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून अजूनही महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. या मतदार संघाच्या जागावाटपाबाबत अजूनही एकमत होत नसल्याचे चित्र आहे.
सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharadchandra Pawar), तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा आहे. या तीन जागांचा तिढा सोडवण्यासाठी काल शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील यांची काल बैठक झाली. मात्र या बैठकीत तिन्ही जागांचा तिढा सुटला नाही.
शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शरद पवारांची भेट घेतली. या जागांचा तिढा संपवा, अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली. त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या जागांवर अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाले नसल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी होणार?
तीन जागांचा तिढा निर्माण झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गट अद्याप आपली यादी जाहीर करू शकलेला नाही. या जागांवरती निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही थेट दिल्लीतील नेत्यांशी बोला, असं राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या तीन जागांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भिवंडीची जागा काँग्रेसकडेच राहावी, पदाधिकाऱ्यांची मागणी
दरम्यान, भिवंडी लोकसभा काँग्रेसनेच लढवली पाहिजे, यासाठी आग्रही मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रात काँग्रेस बळकट आहे. त्यामुळं ही जागा मित्र पक्षाकडे गेली तर कोकणातून काँगेस हद्दपार होईल. याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिले पाहिजे. 2014 च्या लोकसभेसाठी राहुल गांधी यांची सभा भिवंडीत झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आणि त्यासाठी न्यायालयात आजही राहुल गांधी यांना यावे लागत आहे. या सर्वाचा बदला घ्यायचा आहे. म्हणून ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे दावेदार दयानंद चोरघे यांनी केली आहे.
आणखी वाचा
Ajit Pawar : भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतो, अजित पवारांचा सख्खा भाऊ-वहिणीला इशारा?