एक्स्प्लोर
coronavirus | शब-ए-बारातला मुंब्य्रातील कब्रस्तान राहणार बंद
येत्या आठ तारखेला असलेल्या शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व मशिदी मधल्या मौलानाची बैठक घेतली आणि त्या रात्री कब्रस्तान आणि मशीद बंद ठेवण्याचे आवाहन केले.
ठाणे : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंब्रा येथे सर्वसहमतीने मशिदी बंद ठेवल्या गेल्या आहेत. आता शब-ए-बारातच्या रात्री कबरस्तान देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंब्य्रासारख्या भागात जर नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करत असतील तर हा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा.
मुंब्रातील कौसा या भागात पहिला covid-19 चा रुग्ण आढळला. त्यामुळे सर्व यंत्रणा हायअलर्ट वर ठेवण्यात आली आहे. कारण मुंब्रा ठाण्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश आहे. म्हणूनच लॉक डाऊनच्या पहिल्या दिवसापासून इथल्या सर्व मशिदी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
इतकेच नाही तर येत्या आठ तारखेला असलेल्या शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व मशिदी मधल्या मौलानाची बैठक घेतली आणि त्या रात्री कब्रस्तान आणि मशीद बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मुंब्रातील मुस्लिम धर्मियांनी दिला आहे.
मुंब्रा येथे एकूण सात कबरस्तान आहेत. हे सर्व कब्रस्तान आठ तारखेला रात्री बंद ठेवण्यात येणार आहेत आणि शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. ठाण्यातील राजकीय नेत्यांनी देखील सर्व मुस्लिम बांधवांना आठ तारखेला बाहेर न येण्याचे आवाहन केले आहे.
Help for Street dogs-cats | परदेशी जातीच्या 34 श्वानांसह मांजरी घराबाहेर, ठाणे SPSAकडून बेघर प्राण्यांना निवारा
काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि इतर बड्या नेत्यांनी मुस्लिम बांधवांना घरीच नमाज पडण्याची आणि शबे बारात ला बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्र सरकारकडून देखील आवाहन करण्यात आले होते. या सर्वांच्या आव्हानाला मुंब्रावासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वांनी देखील याचे पालन करायला हवे.
देशातील कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये एकूण 3000 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये 647 लोक मरकजमध्ये सहभागी झाले होते. तर जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. आतापर्यंत जगभरात 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement