एक्स्प्लोर

मविआचं ठरलं! छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून कोणत्या चिन्हावर लढणार?

Congress Meeting on Shahu Maharaj : शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसच्या आजच्या (दि.5) बैठकीत याबाबतचा निर्णय झालाय.

Congress Meeting on Shahu Maharaj : शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसच्या आजच्या (दि.5) बैठकीत याबाबतचा निर्णय झालाय. शिवसेनेच्या मशाल चिन्हावर शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) निवडणूक लढवावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. मात्र, ही जागा काँग्रेसला (Congress) जात असल्याने हात या चिन्हावरच निवडणूक लढली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

तिन्हा पक्षाचं शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावरुन एकमत 

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचंही शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावरुन एकमत झालंय. शरद पवार शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत आग्रही होती. त्यांना उमेदवारी मिळाली तर मला आनंद होईल, असंही शरद पवार म्हणले होते. दरम्यान, काँग्रेसच्या चिन्हावर लढायचे की, मशाल चिन्हावर यावरुन खलबतं सुरु होती. आज कोल्हापूरच्या जागेवरुन मॅरोथन बैठका पार पडल्या. काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी, यावर एकमत असल्याचं म्हटलंय. 

शरद पवार यांच्या भेटीनंतर उमेदवारीच्या चर्चेला उधाण

शरद पवार यांनी न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांनी भेट घेतल्यानंतर निवडणुकीबाबत चर्चा सुरु झाल्या. शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शाहू महाराजांची न्यू पॅलेस येथे जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष म्हणतोय की, शाहू महाराजांना उमेदवारी द्यायची. मात्र, अद्यापही शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी मविआतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. 

शाहू महाराजही निवडणूक लढण्यास इच्छुक 

तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ब्रेकिंग न्यूज ऐषोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे, असं शाहू महाराज म्हणाले होते.

शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श त्यांनी निवडणूक लढवू नये 

"शाहू महाराज (Shahu Maharaj) आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये. आम्ही त्यांना याबाबत विनंती देखील केली आहे. कारण जनतेची तशी इच्छा आहे की, शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये",असे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांच्या नावावर एकमत, मात्र आपल्याच चिन्हावर लढावेत यासाठी तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget