एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाहरुखच्या फॅनने 'मन्नत' समोर स्वत:वर वार केले
'मन्नत'वर सेलिब्रेटींची मांदियाळी होती. घराबाहेर फॅन्स देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या दरम्यान सलीमने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये भरती केले. सलीमला उपचारानंतर सोडूनही देण्यात आले.
मुंबई: काल रात्री बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या 'मन्नत' घरासमोर एका फॅनने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. मोहम्मद सलीम असे या व्यक्तीचे नाव असून तो कोलकात्याच्या असल्याची माहिती मिळाले आहे. शनिवारी रात्री शाहरुखच्या घरी प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.
या पार्टीसाठी 'मन्नत'वर सेलिब्रेटींची मांदियाळी होती. घराबाहेर फॅन्स देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या दरम्यान सलीमने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये भरती केले. सलीमला उपचारानंतर सोडूनही देण्यात आले.
शाहरुखने आपला वाढदिवस आणि प्री-दिवाळी पार्टीचे सोबतच होते. या पार्टीसाठी आमिर खान, अर्जुन कपूर, इशान खट्टर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, कटरीना कैफ, संजय लीला भंसाली, काजोल, मान्यता दत्त, अर्पिता खान शर्मा, अलवीरा अग्निहोत्री, जया बच्चन, स्वेता बच्चन, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, मलाइका अरोरा, तापसी पन्नू, इम्तियाज अली, शायना एनसी आणि अनेक दिग्गज उपस्थित होते.
2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस होता. याच दिवशी त्याने त्याच्या आगामी 'झिरो' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. या ट्रेलरला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement