एक्स्प्लोर
वसई-नालासोपाऱ्यातील सीरियल रेप प्रकरणात संशयित ताब्यात
सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालेल्या फोटोशी साधर्म्य असलेला एक संशयित तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे.
मुंबई : वसई-नालासोपाऱ्यातील सीरियल रेप प्रकरणात संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालेल्या फोटोशी साधर्म्य असलेला एक संशयित तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे.
नालासोपाऱ्यामध्ये 15 पेक्षा जास्त तरुणींवर बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट हाती लागल्याची माहिती 'माझा'च्या सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत आरोपीविरोधात 11 तरुणींनी तक्रार दिली आहे. पण भीतीपोटी अनेक तरुणींनी तक्रार दिली नसल्याची शक्यता आहे.
सीरियल रेपिस्टची कार्यपद्धत
एखाद्या शांत घराचा अंदाज घेऊन आरोपी दार ठोठावतो. एखाद्या लहान मुलीने दरवाजा उघडला, की तो भावनिक जाळं फेकतो. 'तुझ्या वडिलांनी तुला बोलावलं आहे' हे सभ्यपणे कारणासहित पटवून देण्यात हा माहीर आहे. लहान मुलींना एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकीने बलात्कार करतो.
नवी मुंबईत सहा, मुंबईत एक, ठाणे शहर येथे एक, ठाणे ग्रामीण येथे दोन, पालघर जिल्ह्यात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement