एक्स्प्लोर
पवई लेकमध्ये मासेमारीपासून रोखलं, दोघांनी सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकलं!

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईतील पवई परिसरात काल रात्री (17 एप्रिल) सुरक्षारक्षकाच्या हत्येची घटना घडली. शोएब सनाउल्लाह खान असे मृत व्यक्तीचे नाव असून, दोन आरोपींनी हल्ला केला. पवई लेकमध्ये मासेमारी करण्यापासून रोखल्याने संतापलेल्या दोन तरुणांनी सुरक्षारक्षक शोएब सनाउल्लाह खान यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शोएब यांचा मृत्यू झाला. पवई लेकमध्ये रात्रीच्या वेळी लपून-छपून काहीजण मासेमारी करतात, अशी माहिती मिळली होती. यानंतर पवई लेक परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. तरबेज आणि सलीम नामक दोन तरुण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी पवई लेकजवळ आले. सुरक्षारक्षकाने दोन्ही तरुणांना रोखले. त्यानंतर सुरक्षारक्षासोबत आरोपी तरुणांचं भांडण झालं आणि शाब्दिक बाचाचाबी मारहाणीपर्यंत पोहोचली. आरोपींनी चाकूहल्ला करत सुरक्षारक्षकाची हत्या केली. पवई पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली असून, आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
आणखी वाचा























