एक्स्प्लोर

ऐतिहासिक "एस्प्लनेड मेन्शन"चं भवितव्य आता हायकोर्टाच्या हाती

काळाघोडा येथील "एस्प्लनेड मेन्शन" जमीनदोस्त करायची की दुरुस्तीद्वारे तिला गतवैभव मिळवून द्यायचे यावरुन म्हाडा आणि अन्य पक्षकारांमध्ये मतभिन्नता आहे. या पार्श्वभूमीवर 18 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : काळाघोडा परिसरातील धोकादायक स्थितीत असलेल्या ऐतिहासिक 'एस्प्लेनेड मेन्शन' इमारतीचं जतन करायचं? की ही इमारत जमीनदोस्त करायची? त्याबाबत 18 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हेरिटेज, आर्किटेक्ट तसेच स्ट्रक्चरल इंजिनिरला दिले आहेत. फोर्ट येथील 155 वर्ष जुनी ऐतिहासिक 'एस्प्लनेड मेन्शन' ही इमारत महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. प्रसंगी ही इमारत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ही इमारत पाडण्यात यावी असा अहवाल आयआयटी मुंबईनं याआधीच कोर्टात सादर केलेला आहे. यासंदर्भात अली मोहम्मद यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठासमोर बाजू मांडताना जागा मालक तसेच भाडेकरुंनी या इमारतीची डागडुजी करण्यात यावी अशी विनंती खंडपीठासमोर केली. त्याचबरोबर हेरिटेज विभागानेही या इमारतीचे जतन करावे अशी भूमिका घेतली आहे. म्हाडा आणि अन्य पक्षकारांमध्ये मतभिन्नता  ब्रिटिशकालीन आणि हेरिटेज वारसा लाभलेल्या एस्प्लनेड मेन्शन सध्या मोडकळीस आली आहे. या इमारतीचा परिसर धोकादायक झाल्यामुळे संपूर्ण इमारत आता म्हाडाने ताब्यात घेतली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये आणि पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण इमारतीला जाळी लावण्याचे आणि आसपास बॅरीकेट्स उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार इमारतीमध्ये जुनं लाकूडकाम आणि ब्रिटिशकालीन लोखंडानं काम असल्यामुळे त्याची दुरुस्ती करणं कठिण आहे. तेव्हा ही इमारती पाडणंच योग्य ठरेल. मात्र, या अहवालाला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्स अँण्ड कल्चरच्यावतीनं एका याचिकेद्वारे विरोध केला आहे. ही इमारत हेरिटेजच्या श्रेणी दोनमधील असून त्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्‍यक आहे. त्यामुळे इमारतीचे पाडकाम करण्याची आवश्‍यकता नाही, असा दावा या याचिकेत केला आहे. इमारतीचा म्हाडाने केलेला अहवाल अपूर्ण असून अद्यापी स्वतंत्रपणे त्याचे सर्वेक्षण व्हायला हवे, तसेच ही एक हेरिटेज वास्तु असल्यामुळे तिचे पाडकाम शक्‍य तितके टाळण्याची आवश्‍यकता आहे, असे याचिकेत म्हटले आहे. म्हाडाने इमारतीचं दुरुस्ती काम करावे आणि इमारतीचे जतन करावे, अशी मागणीही याचिकेत केली आहे. म्हाडानं या प्रकरणी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केले असून यापुढे करण्यात येणाऱ्या कामाचा नियोजनबद्ध तपशीलही सादर केला आहे. संबंधित बातम्या : पिंपरी-चिंचवड पत्राशेड प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना हायकोर्टाचा दिलासा 'नवरा रात्री उशिरा घरी येतो', हे पत्नीच्या आत्महत्येसाठीचं कारण होऊ शकत नाही : हायकोर्ट Sureshdada Jain | घरकुल घोटाळाप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget