Sanjay Raut on Suprime Court : या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही? हे उद्या कळेल, संजय राऊतांची टिप्पणी
Sanjay Raut on Suprime Court : बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढ्यात कोणाला दिलासा मिळणार आणि कोणाला झटका बसणार याचे उत्तर उद्या सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे.
Sanjay Raut on Suprime Court : एकनाथ शिंदे बंडाळी करून शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर दोन्ही बाजूकडून कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील न्यायालयीन कोणाला दिलासा मिळणार आणि कोणाला झटका बसणार याचे उत्तर उद्या सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीवर फक्त राज्यातील, नव्हे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाकडून एकमेकांचा व्हीप उल्लंघन तसेच तसेच 16 आमदार आमदार अपात्रतेची कारवाई आणि सत्तांतराला देण्यात आलेले आव्हान या सर्व बाबींवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज मातोश्रीवर पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना खासदार यांनी या देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही? हे उद्या कळेल, अशी प्रतिक्रिया दिली.
न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे हे सर्वांना माहीत असल्याचे ते म्हणाले. कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्हाला माहीत आहे, न्याय व्यवस्था किती दबावात आहे, पण न्याय होईल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
- मातोश्रीवर रोजच बैठका सुरू आहेत
- सर्वजण उद्धव ठाकरेंना भेटत आहेत
- शिवसैनिक जिथे आहेत तिथं आहेत
- आम्ही कायम मातोश्री सोबत आहोत, आई सोबत गद्दारी करणार नाही
- कोणी गेले फरक नाही पडत, कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही
- लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू आहे
- उद्या कळेल लोकशाही जिवंत आहे की नाही
इतर महत्वाच्या बातम्या