एक्स्प्लोर

Sanjay Raut: 'तुम्ही ज्यांची नाव घेताय त्यांच्याशी...', वडिलांच्या हत्याप्रकरणातील झिशान सिद्दीकींच्या जबाबावरती संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

Sanjay Raut on Baba Siddique case: झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात आणखी काही नेत्यांच्या नावांचा समोर आल्याने आता घडामोडींना वेग आला आहे.

Baba Siddique Murder Case Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांची (12 ऑक्टोबर रोजी) वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्या प्रकरणात  राष्ट्रवादीचे नेते आणि बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हत्या प्रकरणाची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 26 जणांना अटक केली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात आणखी काही नेत्यांच्या नावांचा समोर आल्याने आता घडामोडींना वेग आला आहे.  याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणालेत संजय राऊत?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणांमध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडून जबाब नोंदवला गेला आहे, त्यामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट मध्ये खाजगी बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते, मोहित कंबोज यांच्याशी हत्येच्या आधी बाबा सिद्दीकी यांच्याशी चर्चा झाली. अशा पद्धतीची माहिती आणि अकरा बिल्डर्सची नावे या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी दिली आहेत. या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या प्रकरणाची माझ्याकडे कोणती माहिती नाही. त्या विषयाशी माझा तसाही कोणता संबंध नाही. झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे, हे पहावे लागेल. मला माहित नाही. मला त्या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नाव घेताय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यावरती मी कोणताही मत व्यक्त करणार नाही, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मोहित कंबोज या प्रकरणी काय म्हणालेत?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणांमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर आता त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलताना म्हणाले, आज एक बातमी आली आहे. झिशान सिद्दीकी यांचे स्टेटमेंट तोडून वापरले जात आहे. माझे यात नाव नाही, झिशान सिद्दीकींनी बाबा सिद्दीकी यांची जी घटना झाली, त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांचे माझ्याशी बोलणे झाले होते अशी माहिती दिली आहे, त्यांचे वाक्य तोडून वापरले जात आहे. बाबा सिद्दीकी आणि मी वारंवर बोलत असायचो. जी घटना झाली ते माझ्यासाठी धक्कादायक होती. मी आणि ते वांद्र्याचे रहिवाशी असल्याने बोलायचो. तसेच आम्ही एनडीएचे घटक असल्याने राजकीय मुद्द्यांवर ही चर्चा व्हायच्या. मी सांगू इच्छितो की, बाबा सिद्दीकी यांच्यासोबत जी घटना घडली, ते बाहेर यायला हवे. तसेच कारवाई झालीच पाहिजे, मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात काय म्हटलंय?

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या पोलीस जबाबात म्हटलं आहे की, मी वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध सतत आवाज उठवत होतो आणि निषेध करत होतो. मी स्थानिक आमदार होतो, त्यामुळे नागरिकांचा मुद्दा मी मांडत होतो. या काळात, माझा कोणताही दोष नसतानाही खेरवाडी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तेथे राहणाऱ्या लोकांची बैठक बोलावली. त्यावेळी ते म्हणाले की, जर तुमचा माझ्यावर (अनिल परब) विश्वास असेल तर मी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला आणीन, तुम्ही त्याला मान्यता द्या...त्यानंतर, मी (झीशान सिद्दीकी) पुन्हा तिथे राहणाऱ्या लोकांसोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितले की तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता पण बिल्डर निवडण्यापूर्वी कागदपत्रे वाचा आणि कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा. यानंतर, पृथ्वी चव्हाण नावाच्या एका विकासकाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला आश्वासन दिले की काळजी करू नका आणि आम्ही त्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरांच्या बदल्यात घरे देऊ...यानंतर मी महासभेच्या ठराव बैठकीतही भाग घेतला, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget