एक्स्प्लोर

संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? महाराष्ट्राला नवीन पोलीस महासंचालक मिळण्याची शक्यता

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey)यांचं पद धोक्यात आलं आहे. संजय पांडे हे या पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey)यांचं पद धोक्यात आलं आहे. संजय पांडे हे पोलीस महासंचालक या पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  महासंचालक पदावर रुजू झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे क्लियरन्स लागतं. जे आता संजय पांडे यांना मिळण्याची शक्यता मावळली आ. त्यामुळे राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या संदर्भात मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता आयोगाने उत्तर दिले आहे. पांडे यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली असल्याची माहिती आहे. मात्र काही राज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला बगल दिली आहे, त्यामुळे यावर मुख्यमंत्री हेच शेवटचा निर्णय घेऊ शकतात, असं देखील बोललं जात आहे.

संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरात अवकाश घेऊन सुमारे दोन वर्षे खासगी क्षेत्रात सेवा केली होती. दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर ही भीती अखेर खरी ठरली आहे. लोकसेवा आयोगाच्या 1 नोव्हेंबरला झालेल्या शिफारसी या 10 नोव्हेंबरच्या सुमारास मुंबईत पोहोचल्या आहेत. 

संजय पांडे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागल्यास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ.के.वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यापैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड केली जाऊ शकते.

Sanjay Pandey : सर्वात वरिष्ठ असूनही महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे राज्य सरकारवर नाराज

संजय पांडे सेवेत असताना त्यांनी अवकाश घेत खाजगी सेवेतही काम केलं जे त्यांच्या विरोधात गेलं. सरकारी अधिकारी अशा प्रकारे अवकाश घेऊन खाजगी सेवेत कसा काम करू शकतो असाही प्रश्न केंद्रीय लोसेवा आयोगाच्या पुढे उपस्थित झाला. मात्र यावर आता राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

संजय पांडे यांच्या आधी सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे राज्याचे पोलिस महासंचालक होते. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर त्यांच्या जागी नगराळेंनी मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पांडे यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी वर्णी लागली होती. 

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द


- आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण

- 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी

- सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात

- मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले

- 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना

- 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे 
 
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला

- 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.

- 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
 
- 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.

- 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

- 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते

- 2001 मध्ये  राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.

- 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.

- कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.

- 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.

- 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.

- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.

- 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde On MVA : महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी, एकनाथ शिंदेंची टीकाVare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024Vinod tawde Full PC : विनोद तावडे यांची पत्रकार परिषद एबीपी माझा ABP MajhaAmravati Amit Shaha Stage Collapsed : ज्या मैदानासाठी बच्चू कडूंनी राडा घातला तिथला मंडपच कोसळला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Embed widget