शिवसेनेने काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वतःचं तोंड बंद ठेवावं; बिहार निवडणुकीवरुन संजय निरुपमांची टीका
बिहार निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांचे सर्व उमेदवार जवळजवळ पराभवाच्या मार्गावर आहेत. यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Bihar Election Result 2020: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटे की टक्कर दिसत आहे. एनडीएला यश मिळत असले तरी काही विधानसभा जागांवर राजद आणि महागठबंधन फारसे मागे नाहीत. या निवडणुकीत शिवसेनेने देखील 22 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांचे सर्व उमेदवार जवळजवळ पराभवाच्या मार्गावर आहेत. अशावेळी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
संजय निरुपम यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय, की शिवसेनेने बिहारमध्ये 22 जागा लढवल्या. त्यातील 21 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी आपलं तोंड बंद ठेवा. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. येथे त्यांच्या 22 पैकी 21 उमेदवार जवळजवळ पराभवाच्या मार्गावर आहेत.
शिवसेना ने बिहार में 22 सीटों पर चुनाव लड़ा था। सुना है कि 21 सीटों पर उन्हें नोटा से भी कम वोट मिले हैं। इसलिए कॉंग्रेस को नसीहत देने की बजाय अपना मुँह बंद रखे।#BiharElectionResults
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2020
3733 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 66, काँग्रेस 21 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 74, जेडीयू 48, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत तर 33 जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.