एक्स्प्लोर
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना अटक आणि सुटका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने, त्यांना विरोध होऊ नये यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना आज अटक करुन 149 कलमा अंतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
मुंबई आणि पुण्यातील विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी मुंबईत असल्याने संजय निरुपम नोटाबंदीविरोधात आज वांद्रे कुर्ला संकुलात मूकमोर्चा काढणार होते. त्यापार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. पण नंतर अटक करुन संध्याकाळी त्यांना 149 कलमाअंतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
संजय निरुपम यांना बेवर्ली हाईट्स या घरातच स्थानबद्ध केल्यानंतर घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement