एक्स्प्लोर

Sachin Vaze Arrested |  वेळ नाही म्हणून आईच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते एपीआय सचिन वाझे

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटकं मिळाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. या आधीही एका प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. 

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं मिळाल्या प्रकरणी तपास अधिकारी सचिन वाझे हे सध्या चर्चेत आलेले आहेत. या प्रकरणात सापडलेल्या गाडीच्या मालकाचा संशयितरित्या मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे वर आरोप ठेवण्यात आलेत आणि शनिवारी रात्री उशीरा त्यांना एनआयएने अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर मिळालेली स्पोटकं आणि  मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणाचे संतप्त पडसाद विधिमंडळात देखील उमटलेले आहेत. एकूणच या प्रकरणात राज्य सरकारने सध्या तरी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याची बदली केलेली आहे. सचिन वाझे आहेत तरी कोण ?

सचिन वाझे हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभ्या मारुती मंदिराजवळ त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्याचे दुसरे भाऊ कार इंडस्ट्री मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. एक सनकी स्वभावाचा पोलीस म्हणून सचिन वाझे यांची कोल्हापुरात ओळख आहे.

Sachin Vaze : अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 

लहानपणापासूनच पोलीस दलात रुजू होण्याची सचिन वाझे यांची इच्छा होती. पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी कोल्हापूरमधील कुटुंबीयांसोबत आपलं नातं तोडून टाकलं. त्यांच्या आईचं काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर सचिन वाजेना ही दुःखद वार्ता कळवण्यात आली त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात येण्यास नकार दिला होता. 'मला वेळ नाही' असा निरोप देऊन त्यांनी आईचे अंत्यसंस्कार लहान भावाला करण्यास सांगितले होते. 

सचिन वाझेवर मधल्या काळात काही आरोप लागल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या वेळी त्यांनी चीन इथल्या काही कंपन्यांसोबत करार करून चायनीज वस्तू इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यांचा हा व्यवसाय अद्यापही सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे

शनिवारी समोर आलेल्या सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं होतं.  सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की,  2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते.  मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं.  17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत.  4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं. 

Sachin Vaze | अटकपूर्व जामीन अर्जात एपीआय सचिन वाझे म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget