(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची कसून चौकशी केली असून या चौकशीत एनआयए अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली आहे. एक भली मोठी वायर असून एक ड्रेसही आहे.
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची कसून चौकशी केली असून या चौकशीत एनआयए अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली आहे. एक भली मोठी वायर असून एक ड्रेसही आहे. यामध्ये चेक्सचा शर्ट आणि ब्राउन कलरची पँट आहे. त्याचसोबत अनेक डायऱ्याही या कारमध्ये सापडल्या आहेत. एवढंच नाहीतर या कारमध्ये अनेक नंबर प्लेट्सही आढळून आल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली आणि एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारपासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. त्यानंतर याप्रकरणात दुसरी कार समोर आली ती म्हणजे, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवून ठेवून आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा कार. आणि आता या प्रकरणात तिसऱ्या कारची एन्ट्री झालेली आहे ती म्हणजे, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार. आता या मर्सिडीजचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज कारचा या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्या प्रकरणी जे सीसीटीव्ही फुटेज आढळून आलं होतं, त्या फुटेजमध्ये स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आणि आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी दिसून आली होती. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे अनेक पुरावे समोर आले होते. तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अखरे सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. अशातच त्यानंतर सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कारही एनआयएनं ताब्यात घेतली आहे. तसेच त्या कारची चौकशीही करण्यात आली.
पोलीस अधिकारी सचिन वाझे निलंबित
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून झालेल्या चौकशी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये ही स्फोटकं आढळली होती. तसेच एक इनोव्हा कारही या परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. या इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून एक व्यक्ती खाली उतरला होता. एनआयए या व्यक्तीचा शोध घेत आहे. ती व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयच्या टीमला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :